मुंबई | मशिदींवरील भोंग्यांवरून राज्यातील वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्यांवरून आक्रमक भूमिका घेतल्यानंतर यावरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटायला सुरूवात झाली आहे.
राज ठाकरेंच्या भूमिकेवरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात असताना जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर (Medha Patkar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकाच धर्माला लक्ष करण्याचा हा सारा अमानवीय प्रकार सुरू असल्याचा आरोप मेधा पाटकर यांनी केला आहे.
सध्या राज्यात भोंग्याचं नाही तर भोंगळं राजकारण सुरू आहे, असा घणाघात मेधा पाटकर यांनी केला आहे. अस्मितेचे प्रश्न उठवायचे आणि अस्तित्वाचे प्रश्न नाकारायचे असं सध्याच्या राजकारणाचं स्वरूप झालं आहे. एका धर्माच्या मतांचे गठ्ठे मिळवण्याठी ही सर्व उठाठेव, अशी बोचरी टीका मेधा पाटकर यांनी केली आहे.
दरम्यान, राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळाव्यासह उत्तर सभा व औरंगाबाद येथील जाहीर सभेत बोलतानाही मशिदींवरील भोंग्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली. यानंतर राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत त्यांच्या मशिदींवरील भोंग्याविरोधातील आंदोलनावर ठाम असल्याचं स्पष्ट केलं आहे.
थोडक्यात बातम्या-
“बाळासाहेबांची शिकवण आणि पवार साहेबांची सोबत, इकडची दुनिया तिकडे करू”
“उद्धव ठाकरे तुम्ही सुखाने नांदा, पण होऊ देऊ नका तुमचा वांदा”
नवनीत राणांच्या भेटीनंतर चित्रा वाघ संतापल्या, म्हणाल्या…
प्राजक्ता माळीचा बोल्ड अंदाज, बिनाब्लाऊजच्या साडीत बघून नेटकरी संतापले
राणा दांपत्यावरील ‘ती’ कारवाई ठाकरे सरकारच्या अंगलट, न्यायालयाने सरकारला फटकारलं
Comments are closed.