बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सत्तेसाठी एकत्र येणार?, फडणवीस-ठाकरेंचा ‘तो’ व्हिडीओ तुफान व्हायरल

मुंबई | येत्या काही दिवसात महापालिकेच्या निवडणुका लागणार आहेत. आगामी महापालिकेच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. अशातच मनसे आणि भाजप या दोन्ही पक्षांमध्ये युतीच्या चर्चांना उधाण आहे. त्यातच आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट झाली आहे. (Meeting Of Devendra Fadnavis and MNS president Raj Thackeray)

देवेंद्र फडणवीस आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नव्या निवासस्थानी म्हणजेच शिवतीर्थावर दाखल झाले. त्यावेळी पत्नी अमृता फडणवीस देखील हजर होत्या. त्यामुळे ही कौटुंबिक भेट असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, या भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.

राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीचे फोटो आणि व्हिडीओ सध्या जोरदार व्हायल झाले आहेत. ही भेट कौटुंबिक जरी असली तरी राजकीय चर्चा झाल्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे. या भेटीत मनसे आणि भाजप युतीची चर्चा झाल्याची शक्यता देखील वर्तवण्याच येत आहे.

दरम्यान, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत यंदा भाजप विरूद्ध शिवसेना असा थेट सामना पहायला मिळणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यापुर्वी देखील राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यावेळी परप्रांतियांच्या मुद्द्यावरून या दोन्ही पक्षांमध्ये मतभेद असल्याचं समोर आलं होतं. आता मनसे आणि भाजप युती होणार का?, असा थेट सवाल उपस्थित केला जातोय.

पाहा व्हिडीओ-


थोडक्यात बातम्या-

खासदार असदुद्दीन ओवेसींनी वाहतुकीचा नियम मोडल्याने भरावा लागला 200 रुपयांचा दंड

चला मला अटक करा!, कंगनानं पोस्ट केला वाईन पितानाचा हॉट फोटो

कृषि कायदे मागे घेण्याच्या प्रस्तावावर महत्त्वाचा निर्णय

LIC च्या ‘या’ स्कीमद्वारे मुलीचं भवितव्य होईल सुरक्षित, लग्नाच्या वेळी मिळतील 22 लाख

शरद पवारांच्या भेटीनंतर काय घडलं?, साताऱ्यात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More