Top News

जम्मू काश्मीरचा झेंडा मिळत नाही तोपर्यंत अन्य ध्वज फडकवणार नाही- मेहबुबा मुफ्ती

श्रीनगर | जोपर्यंत जम्मू काश्मीरचा झेंडा मिळत नाही तोपर्यंत अन्य ध्वज फडकवणार नाही, असं वक्तव्य मेहबुबा मुफ्ती यांनी केलं. श्रीनगर मधील गुपकर रोडवरील निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत मेहबुबा मुफ्ती बोलत होत्या.

मुफ्ती यांनी भारतीय झेंड्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे त्यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी जम्मू काश्मीर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र रैना यांनी उपराज्यपालांकडे केली आहे.

काश्मीरच्या जनतेला भडकावण्याचे काम मेहबुबा मुफ्ती यांच्या सारख्या नेत्यांनी करु नये. येथील शांतता आणि बंधुभावाला तडा जावू देणार नाही. जर काही चुकीचे घडले तर त्यांना परिणाम भोगावे लागतील, असा इशारा रवींद्र रैना यांनी दिलाय.

उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी मेहबुबा मुफ्ती यांच्या देशद्रोही वक्तव्याची दखल घेऊन त्यांना अटक करावी, अशी मागणी रैना यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण!

“….म्हणून पंकजा मुंडे भाजप सोडणार नाहीत”

“प्रविण दरेकर आणि राधाकृष्ण विखे यांना काय चॉकलेट देवून आणलं का?”

मुंबईकरांनो मास्क घातला नसेल तर आता रस्ता झाडावा लागेल!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या