बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाने मुलगा हिरावला, 15 लाखांची FD मोडून मेहता दाम्पत्याने केली कोरोना रूग्णांना मदत

अहमदाबाद | कोरोनामुळे सध्या देशभरात वाईट परिस्थिती आहे. कोरोनामुळे प्रत्येकाला आपली जवळची व्यक्ती गमवावी लागली आहे. त्यामुळे प्रत्येकाला कोरोना महामारीची चांगलीच किंमत मोजावी लागत आहे. यातच आता अहमदाबादच्या मेहता दांपत्याने जगासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे.

गुजरातमधील रसिक मेहता आणि कल्पना मेहता यांनी मागील वर्षी कोरोनामुळे आपला एकुलता एक मुलगा गमावला. मेहता दांपत्याने आपल्या मुलाच्या भविष्यासाठी काही पैसे जमा करून ठेवले होते.पण मुलगाच राहिला नसल्यानं मेहता दांपत्याने आपल्या मुलाच्या भविष्यासाठी जमा केलेला पैसा करोना रुग्णांसाठी वापरण्याचा निर्णय घेतला.

मेहता दांपत्याने 15 लाखांची एफडी आपल्या मुलासाठी केली होती. त्यांनी एफडीची कालावधी पूर्ण होण्याआधीच ती मोडली. करोनाचा संसर्ग झाल्यानं आर्थिक संकटात सापडलेल्या व्यक्तींना आणि मदत हव्या असणाऱ्या रुग्णांसाठी त्यांनी हे 15 लाख वापरले आहेत.

दरम्यान, नौशीन खान या महिलेने ट्विटरवर या दोघांचा फोटो शेअर केला होता. मेहता दांपत्याने आपली 15 लाखांची एफडी मोडली. करोनामुळे त्यांचा मुलगा मागील वर्षी मरण पावला. त्याच्या भविष्यासाठी त्यांनी हा पैसा साठवला होता. आता तो पैसा ते कोरोना रुग्णांसाठी वापरत आहेत. त्याचा खरचं अभिमान वाटतो, असं नौशीन खान म्हणाल्या.

पाहा ट्विट-

 

थोडक्यात बातम्या-

काँग्रेस खासदार राजीव सातव यांची प्रकृती खालावली; राहुल गांधींचा थेट डॉक्टरांना फोन

“देशाबाबत कितीही गर्व करत असले तरी, अवैज्ञानिक लोक देशाला बरबाद करू शकतात”

मोठी बातमी! दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डीला अटक

‘महाराष्ट्र दिन साधेपणाने साजरा करा’; महाराष्ट्र दिनानिमित्त राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचना जारी

मास्क न घालणाऱ्यांची दादागिरी, दंड मागणाऱ्या पोलिसाच्या अंगावर सोडला कुत्रा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More