बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…अन् भर मैदानात मेस्सी ढसाढसा रडला; व्हिडीओ पाहून चाहतेही झाले भावूक!

मुंबई | देशासाठी चषक जिंकण्याचं स्वप्न प्रत्येक खेळाडूचं असतंय. त्यासाठी खेळाडू प्रचंड मेहनत घेत असतात. फुटबाॅल हा जगातील सर्वात प्रसिद्ध खेळ आहे. फुटबाॅल जगतात मानाच्या कोपा अमेरिका स्पर्धेत महान खेळाडू लिओनेल मेस्सी याने हाॅट्रिक नोंदवली आहे. त्यानंतर त्याचा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

गुरुवारी वर्ल्ड कप क्वालिफाईंगच्या सामन्यात बोलिविया संघावर 3-0 अर्जेंटीनाने विजय मिळवला आहे. त्याचसोबत अर्जेंटीनाने कोपा अमेरिका ट्राॅफीवर नाव कोरलं आहे. या सामन्यात मेस्सीने तीन गोल केले. कोपा अमेरिका स्पर्धा जिंकताच अर्जेंटीनाच्या देशवासियांनी आनंद व्यक्त केला आहे. त्यावेळी मेस्सी भावूक झालेला पहायला मिळालं.

सामना जिंकल्यानंतर ट्राॅफी घेण्यासाठी खेळाडू मैदानात आले. सामन्यातील विजय महत्त्वाचा असल्यानं मेस्सीला मैदानावर अश्रू अनावर झाले होते. त्यावेळी इतर खेळाडूंनी त्याला सावरण्याचा प्रयत्न केला. मेस्सीला पाहून त्याचे चाहते देखील भावूक झाल्याचं पहायला मिळालं आहे.

दरम्यान, या सामन्यात मेस्सीने विरोधी संघाला सामन्यावर विर्चस्व मिळवू दिलं नाही. दक्षिण अफ्रिकेतील सर्वाधिक गोल करणाऱ्या पेलेचा रेकाँर्ड मेस्सीने मोडला आहे. मेस्सीने आतापर्यंत 79 आंतराष्ट्रीय गोल केले आहेत. तर पेलेने 77 गोल केले होते.

पाहा व्हिडीओ-

 

थोडक्यात बातम्या-

कोरोनामुळे नाही तर आयपीएलमुळे सामना रद्द???; इंग्लंड क्रिकेट बोर्डाचं सुचक वक्तव्य

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काॅंग्रेस पक्ष काढणार ‘इतक्या’ हजार किलोमीटरची यात्रा

देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकारसाठी गणरायाकडे घातलं ‘हे’ साकडं

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोनाची भीती दाखवत…”; रवी राणांची खरमरीत टीका

“नारायण राणे यांना उंचीवरून काय बोलणार?”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More