बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मुस्लिमांनी लोकसंख्येवर नियंत्रण ठेवावं’; आसामच्या मुख्यमंत्र्यांचं वादग्रस्त वक्तव्य

गुवाहाटी | गेल्या काही दिवसांपुर्वी महंत नरसिंहानंद यांनी भारतात मुस्लिमांची वाढती संख्या चिंताजनक असल्याचं म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर अनेक संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यानंतर आता आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून सध्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

जमिनीवरील अतिक्रमणासारख्या सामाजिक संकटावर तोडगा काढायचा असल्यास स्थलांतरीत मुस्लिमांना कुटुंब नियोजनाचे पालन करून लोकसंख्येवर नियंत्रण ठेवावे लागेल. जर लोकसंख्येचा विस्फोट सुरू राहिला तर एके दिवशी मंदिराच्या जमिनीवरही कब्जा होईल, एवढेच काय तर माझ्या घरावरही अतिक्रमण होईल, असं वक्तव्य हिमंता बिस्वा सरमा यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याने आसाममध्ये वाद सुरू झाला आहे.

आसामची एकूण लोकसंख्या 3.12 कोटी असून या लोकसंख्येमध्ये तब्बल 31 टक्के लोक हे स्थलांतरीत मुस्लिम आहेत. आसाममधील 126 पैकी 35 मतदारसंघात त्यांची मते निर्णायक ठरतात. त्यामुळे आता स्थलांतरीत विरूद्ध स्थानिक असा वाद सुरू झाला आहे. एआययूडीएफचे सरचिटणीस अनिमूल इस्लाम यांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांचे हे वक्तव्य राजकीय हेतूने प्रेरित असून एका समुदायाविरोधातील असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

दरम्यान, भारतात मुस्लिमांची वाढती संख्या चिंतेचा विषय आहे. ज्याठिकाणी मुस्लिमांची संख्या वाढली आहे त्याठिकाणी ते इतरांना जिवंत सोडत नाहीत. हिंदू नेत्यांवर भरवसा ठेऊ नका, असं वक्तव्य महंत नरसिंहानंद यांनी केलं होतं. कोरोना महामारी हे सरकारचं षडयंत्र आहे. मास्क लावून लोकांना आजारी पाडलं जातंय. त्यामुळे मी ना मास्क लावणार ना कोरोना आहे असं मानणार, असं महंत नरसिंहानंद यांनी म्हटलं होतं.

थोडक्यात बातम्या-

“प्रकाश आंबेडकरांशी आघाडी करण्यासाठी लवकरच चर्चा करणार”

“शरद पवार देशाचे पंतप्रधान झाल्यास आम्हाला आनंदच होईल”

“प्रकाश आंबेडकरांना नको तिथे नाक खुपसून प्रसिद्धीत राहण्याची घाण सवय”

“कोरोनातून बरे झालेल्यांना लस देण्याची आवश्यकता नाही”

भाजपला मोठा धक्का; एका खासदारासह तीन आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत???

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More