बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…तर MIM देखील गप्प बसणार नाही, बघू आम्हाला कोण थांबवतं”

औरंगाबाद | सध्या अनेक मुद्द्यांवरून राज्यातील वातावरण तापलेलं पाहायला मिळत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी औरंगाबादमध्ये सभा घेतल्यानंतर आता शिवसेना (Shivsena) देखील औरंगाबादेत सभा घेण्यासाठी सज्ज झाली आहे.

मनसेनंतर शिवसेना देखील शिवसेनेच्या वर्धापनदिनी 8 जून रोजी औरंगाबादमध्ये सभा घेणार आहे. त्यामुळे मनसेनंतर जर शिवसेना औरंगाबादमध्ये सभा घेणार असेल तर एमआयएम (MIM) देखील मागे राहणार नाही. आम्ही देखील त्याच ग्राउंडवर सभा घेणार, असा इशारा एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी दिला आहे.

एमआयएम गप्प बसणार नाही. त्याच मैदानावर खुर्च्या न टाकता एमआयएम प्रचंड भव्य सभा घेणार. तेव्हा मला कोण थांबवतं बघू, असं आव्हान जलील यांनी दिलं आहे.

दरम्यान, ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. तसेच महापालिका निवडणुकांची प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्याचे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना आणि एमआयएमच्या आगामी सभा महत्त्वाच्या ठरू शकतात.

थोडक्यात बातम्या-

पोस्टात नोकरीची सुवर्णसंधी, 10वी उत्तीर्ण आहात तर ही बातमी तुमच्यासाठीच

यंदाही चक्रीवादळ धडकणार, ‘या’ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा जारी

‘…तर पुतिन यांची हत्या होऊ शकते’, धक्कादायक माहिती समोर

मोठी बातमी! जेलमधून सुटताच राणा दांपत्य घेणार ‘या’ भाजप नेत्याची भेट

पेट्रोल-डिझेलच्या दरात आज काय बदल झाले?, वाचा आजचे ताजे दर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More