“फडणवीस आणि राज ठाकरेंच्या आश्वासनानंतरच राज्यात मिनी लाॅकडाऊन लागू”
मुंबई | महाराष्ट्रात मिनी लॉकडाऊन जाहीर झाल्यावर राज्यात राजकिय वातावरण तापेल की काय! अशी चिंता व्यक्त केली जात होती. भाजपने राज्यात लॉकडाऊन होऊ नये, यासाठी आक्रमक भूमिका घेतली होती. तर दुसरीकडे मनसेने लॉकडाऊनविषयी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून संपूर्ण सहकार्याचे आश्वासन मिळाल्यानंतरच राज्यात कडक निर्बंधाची घोषणा केली आहे, असं सामनाच्या अग्रलेखातून म्हटलं आहे.
पुण्यातील मंडई आणि बाजारपेठात पाय ठेवायला जागा नाही. पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना सुद्धा समोरची विनामुखपट्यांची गर्दी पाहून स्वतःच्या तोंडावरची मुखपट्टी काढून भाषण करण्याचा मोह आवरता आला नाही. समोरच्या गर्दीत कोरोना चिरडून मेला असेल बहुतेक असं पुढाऱ्यांना वाटू लागलं आहे, असा टोला अग्रलेखातून जयंत पाटलांना लगावला आहे.
कोरोनाविरुद्ध एकत्र लढण्याची गरज आहे. महाराष्ट्रात कोरोनारुग्ण वाढत आहे, याबाबद्दल ज्यांना राष्ट्रीय पातळीवर राजकीय चिंता वाटते त्यांनी महाराष्ट्राने लसीकरणाबाबत केलेल्या विक्रमाची नोंद घ्यायला नको काय? शनिवारी एकाच दिवशी 4 लाख 62 हजार 735 नागरिकांचे लसीकरण करून महाराष्ट्राने राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली आहे. याबाबद्दल दिल्लीश्र्वरांना महाराष्ट्राची पाठ थोपटावीच लागेल, असं मत अग्रलेखातून मांडण्यात आलं आहे.
दरम्यान, मंत्रालये व सरकारी कार्यालये 50 टक्के क्षमतेने काम करतील. मात्र, मिशन ‘ब्रेक द चेन’ यशस्वी करणे हे नागरिकांच्या हाती आहे. शेवटी हा लढा जगण्यासाठी आहे. तो प्रत्येकाने लढायचा आहे. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ आणि ‘मिशन बिगीन अगेन’ या घोषवाक्यांना मागील काही दिवस सरकारने महत्व दिलं होतं. पण आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर दिवसेंदिवस वाढतच चालल्याने सरकारला पुन्हा ब्रेक द चेन या पहिल्या थांब्यावर यावे लागत आहे, असं या अग्रलेखात म्हटलं आहे.
थोडक्यात बातम्या –
‘ब्रेक दि चेन’ मोहीमेअंतर्गत महाराष्ट्र सरकारची नवी सुधारीत नियमावली जाहीर, वाचा सविस्तर
भुकंपाच्या झटक्यानं ‘ही’ चार राज्यं हादरली; पंतप्रधान मोदींनी घेतली फोनवरून माहिती
दिलासादायक! महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येत घट; जाणुन घ्या आकडेवारी
अनिल देशमुख नवी दिल्लीत दाखल, ‘या’ बड्या लोकांना भेटल्याची माहिती
“साधूंची हत्या आणि स्त्रीचा अपमान करेल त्याचा पराभव निश्चित आहे”
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.