Top News आरोग्य कोरोना

कोरोनाची लागण झालेले मंत्री अनिल विज यांची प्रकृती बिघडली

कोरोना लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीत स्वयंसेवक बनलेले हरियाणाचे आरोग्यमंत्री अनिल विज यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. तर आता अनिल विज यांची प्रकृती बिघडली आहे.

अनिल विज यांना रोहतकच्या रुग्णालयातून हलवून गुरूग्रामच्या मेदांता रुग्णालयात हलवण्यात आलंय. यापूर्वी अनिल विज यांना अंबाला रूग्णालयातून रोहतकच्या रूग्णालयात पाठवण्यात आलेलं.

अनिल विज यांच्या फुफ्फुसांमध्ये इन्फेक्शन झालं आहे. मुख्य म्हणजे अनिल विज यांनी 20 नोव्हेंबर रोजी कोरोनावरील लशीच्या चाचणीत सहभाग घेतला होता. आणि त्यानंंतर त्यांना कोरोनाची लागण झाली.

अनिल विज यांच्यासोबत 200 जणांना या लसीचा डोस देण्यात आला होता. पुढील डोस 28 दिवसांनंतर देण्यात येणार होता. मात्र त्यापूर्वीच अनिल विज यांना कोरोनाची लागण झाली होती.

थोडक्यात बातम्या-

70 वर्षीय शेतकऱ्याचा सिंघू सीमेवर आंदोलनादरम्यान मृत्यू!

“देवेंद्र फडणवीस दिल्लीत जावेत ही मुनगंटीवारांची इच्छा”

नागपूरमध्ये झालेल्या पराभवामुळे एका गटाला खूप उकळ्या फुटतायत- अजित पवार

प्रतिक्षा संपली! सिंधुदुर्गातील चिपी विमानतळासाठी मुहूर्त सापडला

“रेकॉर्डवर सांगतोय, मराठा आरक्षण देताना इतरांना धक्का लावणार नाही”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या