बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मंत्री बच्चू कडू यांच्या यूट्यूब चॅनेलला मिळाले मानाचे सिल्व्हर प्ले बटन

अकोला | अकोल्याचे पालकमंत्री तसेच महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या यूट्यूब चॅनलला नुकतच सिल्वर प्ले बटन मिळालं आहे. युट्युब कडून आज मंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांना सिल्वर प्ले बटन प्राप्त झालं आहे. अकोल्याचे जिल्हाधिकारी यांनी बच्चू कडू यांना ते बटन आज कार्यालयात सुपूर्द केलं.

बच्चू कडू हे युट्युबवर व्हिडिओच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्न तसेच अनेक व्हिडीओज टाकून लोकांच्या संपर्कात असतात. अशातच त्यांची सोशल मीडियावरील लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तसेच याच अनुषंगाने गुगलच्या अमेरिकेतील कार्यालयातून युट्युबवरील फॉलोअर्स 1 लाख 87 हजार झाल्यामुळे सिल्वर प्ले बटन मिळालं आहे.

दरम्यान, मंत्री बच्चू कडू हे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. तसेच ट्विटरवर त्यांचे 02 लाख 51 हजार तर फेसबुक वर 07 लाख 2 हजार फॉलोअर्स आहेत. याबरोबरच इन्स्टाग्रामवर 3 लाख 20 हजार लोक त्यांना फॉलो करतात.

आज बच्चू कडू यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलच्या सिल्वर बटनचा जिल्हाधिकारी कार्यालयात स्वीकार केला आहे. तसेच यापुढेही जसजसे फॉलोअर्स वाढत जातील, तसतसे युट्युब कडून त्यांना गोल्ड आणि प्लॅटिनम असे वेगवेगळे प्ले बटन मिळत जातील.

थोडक्यात बातम्या

धक्कादायक! कुंभमेळ्यात तब्बल एवढे लाख कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट बनावट

“…म्हणून मुस्लिम समाजातील लोक कोरोना लस घेण्यास टाळाटाळ करत आहेत”

एकनाथ शिंदे यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या मराठी अभिनेत्याला अटक

“राममंदिर ही भाजपची खासगी मालमत्ता नाही, आम्हीही राममंदिरासाठी विटा दिल्या आहेत”

तब्बल वर्षभरानंतर कोरोनाचं हाॅटस्पाॅट बनलेल्या ‘या’ जिल्ह्यात सर्वात कमी कोरोनाबाधितांची नोंद

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More