Top News महाराष्ट्र मुंबई

मशिदीत नमाजाला जाणाऱ्या मुस्लिम बांधवांना नवाब मलिकांची कळकळीची विनंती; म्हणतात…

Loading...

मुंबई | कोरोनामुळे संपूर्ण देशात सध्या लॉकडाऊन आहे. प्रशासन वारंवार गर्दी टाळण्याचं आवाहन करत आहे. मात्र अशाही परिस्थिती काही मुस्लिम बांधव नमाज अदा करण्यासाठी मशीदीत जात असल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यानंतर आता मंत्री नवाब मलिक यांनी याच मुस्लिम बांधवांना कळकळीची विनंती केली आहे.

माझ्या सगळ्या मुस्लिम बांधवांना मी विनंती करतो की कोरोनाचं एवढं भयान संकट जाईपर्यंत आपण घरातच नमाज अदा करावी. शुक्रवारची (जुम्मा) नमाज देखील आपण मशीदीत न जाता आपल्या घरीच अदा करावी, अशी कळकळीची विनंती त्यांनी केली आहे.

Loading...

कोरोनापासून आपला बचाव करायचा असेल तर आपण घरातच बसलं पाहिजे. गर्दी टाळली पाहिजे, सोशल डिस्टन्सिंग खूर गरजेचं बनलं आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत आपण घराबाहेर पडू नये, असं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, लोकांनी गर्दी टाळावी म्हणून शासन वारंवार आवाहन करत आहे. लोकांच्यामध्ये देखील आता जागरूकता येऊ लागली आहे. काही मुस्लिम बांधवांनी आपली जबाबदारी ओळखून नमाज घरीच अदा करत आहेत. मात्र काही मुस्लिम बांधवांकडून सरकारच्या आदेशाला हरताळ फासला जात होता. आता मलिकांच्या आवाहनानंतर सकारात्मक बदल दिसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जाऊ लागली आहे.

 

 

ट्रेंडिंग बातम्या-

“लॉकडाऊन म्हणजे काय नोटबंदी समजला का? जयंतरावांनी मोदींवर केलेली टीका योग्यच”

सॉरी उद्धवजी… मला तुमची माफी मागायचीय; मुख्यमंत्र्यांकडे अभिनेत्याचा माफीनामा

महत्वाच्या बातम्या-

राष्ट्रवादीचे सर्व आमदार खासदार एक महिन्याचा पगार सहाय्यता निधीला देणार

जिंदादिल बच्चू कडूंनी ओळखली सामाजिक जबाबदारी; एक महिन्याचा पगार देणार कोरोनाच्या लढाईसाठी

भारताने योग्य वेळी योग्य पावलं उचलली आहेत; पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर यांच्याकडून सरकारचं कौतुक

Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या