मुंबई | कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे पसरलेल्या आजारावर नियंत्रण आणण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून विभागीय आयुक्तांना वेगवेगळ्या शासन निर्णयानुसार आतापर्यंत 171 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. पुन्हा आता विभागीय आयुक्तांमार्फत 16 जिल्ह्यांना 39 कोटी 56 लाख रुपये इतका निधी उपलब्ध करून दिला आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
वडेट्टीवार यांनी कोरोना विषाणूचा राज्यातील वाढता फैलाव लक्षात घेता मदत व पुनर्वसन , आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे येणाऱ्या निधीसंदर्भात कोरोना विषाणूच्या संसर्गावर मात करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांवर आयुक्त, जिल्हाधिकारी आणि संबंधित विभागाचे अधिकारी यांच्याशी चर्चा केली
आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून तातडीने विभागीय आयुक्तांच्या मार्फत जिल्ह्यांना निधी वितरित करण्याचे निर्देश सचिवांना दिले. त्यानुसार विभागीय आयुक्तांमार्फत राज्यातील सोळा जिल्ह्यांना 39 कोटी 56 लाख रुपये इतका निधी दिनांक 29 मे 2020 रोजीच्या शासन निर्णयानुसार वितरित करण्यात आला असल्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिली.
या निधीमधून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी बाधित झालेल्या व्यक्तींसाठी विलगीकरण कक्ष स्थापन करणे, तात्पुरती निवासी व्यवस्था करणे, अन्न, कपडे, वैद्यकीय देखभाल, नमुने गोळा करण्यावरील खर्च ही आणि अशीच महत्त्वाची कामं केली जाणार आहेत.
ट्रेंडिंग बातम्या-
3 टप्प्यात खुले होणार व्यवहार; कोणत्या टप्प्यात काय आणि कधी सुरु होणार? वाचा…
केंद्र सरकारच्या नव्या गाईडलाईन्सनूसार काय बंद राहणार, काय उघडणार?
महत्वाच्या बातम्या-
“कोरोना रुग्णांसाठी मुंबईत आठवडाभरात 8 हजारांहून अधिक खाटा उपलब्ध होणार”
मलेरिया, डेंग्युला आळा घालण्यासाठी ‘हे’ काम हाती घ्या- आरोग्यमंत्री राजेश टोपे
अभिनेता सोनू सूद राज्यपालांच्या भेटीला, वाचा भेठीपाठीमागचं कारण…
Comments are closed.