Top News मनोरंजन

मी अजून जिवंत आहे; श्रद्धांजली वाहणाऱ्यांवर लोकांची अभिनेत्रीनं घेतली फिरकी

मुंबई | हिंदी आणि बंगाली चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री मिष्टी मुखर्जी यांचं प्रदीर्घ आजाराशी झुंज देत असताना निधन झालं. मात्र नावात गोंधळ झाल्यामुळे काहींनी चुकून दुसऱ्याच अभिनेत्रीला श्रद्धांजली वाहिली. याच पार्श्वभूमीवर त्या अभिनेत्रीने संताप व्यक्त केला आहे.

मिष्टी मुखर्जी ऐवजी बंगालमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री आणि मॉडेल मिष्टी चक्रवर्तीचे निधन झाल्याचे पोस्ट करत अनेकांनी तिला श्रद्धांजली वाहिली. जेव्हा यासंदर्भातील माहिती मिष्टी चक्रवर्तीला मिळाली तेव्हा तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली.

दरम्यान, काही लोकांच्या मते माझे आज निधन झाले आहे. देवाच्या कृपेने मी जीवंत आणि निरोगी आहे’ असे तिने कॅप्शन दिलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

मी अंधभक्त नाही, गरीब कुटुंबातील व्यक्ती पंतप्रधान बनू शकते हे मोदींनी सिद्ध केलं- कन्हैया कुमार

“राहुल गांधी व्हीआयपी शेतकरी, जे ट्रॅक्टरमध्ये बसण्यासाठी सोफा वापरतात”

…म्हणून काँग्रेसचा कृषी विधेयकाला विरोध- रावसाहेब दानवे

“बाळासाहेबांच्या ‘त्या’ भूमिकेला हरताळ लावण्याचं काम संजय राऊतांनी केलं”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या