खेळ

मिताली राजनं रचला इतिहास; वनडे सामन्यांचं द्विशतक केलं पूर्ण

हॅमिल्टन | भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजनं न्यूझीलंडच्या संघाविरोधात तिसरा एकदिवसीय सामना खेळून 200 वनडे सामने खेळण्याचा विक्रम केला आहे. 200 सामने खेळणारी ती पहिली महिला खेळाडू ठरली आहे.

मिताली राजनं तिच्या क्रिकेट कारकीर्दीची सुरुवात 1999 मध्ये इंग्लड विरोधातील सामन्यात वयाच्या सोळाव्या वर्षी केली होती.

आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये एकदिवसीय सामन्यांत मिताली राजनं 6222 रन केल्या आहेत. मिताली राजनं 200 सामन्यांचा टप्पा पूर्ण केल्यानंतर BCCIनं तिचं अभिनंदन केलं आहे.

दरम्यान, मी कारकीर्दीला सुरुवात केली तेव्हा इथपर्यंत पोहचण्याचा विचार केला नव्हता, मला फक्त भारतीय संघाकडून क्रिकेट खेळायचं होतं, असं मिताली राजनं म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

अंतरिम अर्थसंकल्प म्हणजे नरेंद्र मोदींचा अंतिम जुमला- अरंविद केजरीवाल

-2 महिन्यात मोदी सरकारवर सर्जिकल स्ट्राईक करणार- राहुल गांधी

रामाच्या अवतारात राहुल गांधी; धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी तक्रार याचिका दाखल

-अनिल अंबानींच्या रिलायन्स कम्युनिकेशन्सचा दिवाळखोरीचा प्रस्ताव

भाजप देशात जातीय दंगली घडवणार, योगी सरकारमधील मंत्र्याचा दावा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या