नवी दिल्ली | भारतीय महिला संघातील दिग्गज खेळाडू मिताली राजने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. भारतीय महिला क्रिकेटचा कणा मानली जाणाऱ्या मिताली राजने गेल्या 23 वर्षांपासून क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली आहे. बुधवारी वयाच्या 39 व्या वर्षी भावनिक पत्र लिहित मिताली राजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटला अलविदा केलं.
मिताली राजने दोन दशकांहून अधिक काळ चाललेल्या कारकिर्दीत भारतीय महिला क्रिकेट संघात उत्कृष्ट कामगिरी करत चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. मिताली राजने भारतीय महिला क्रिकेट संघाला एक वेगळी ओळख दिली. तिने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा केलेल्या आहेत. कर्णधार म्हणूनही मिताली राजच्या नावे सर्वाधिक विक्रम आहेत. अशा परिस्थितीमध्ये मिताली राजने निवृत्ती घेणं ही महिला क्रिकेट विश्वातील मोठी घटना आहे.
न्युझीलंडमधील एकदिवसीय विश्वचषक सामन्यामध्ये मिताली राजने भारताचे प्रतिनिधीत्व केलं होतं. मिताली राजच्या नेतृत्वात संघ उंपात्य फेरीपुर्वी बाहेर पडला. जेव्हा मी निळ्या रंगाची जर्सी घालून माझ्या देशाचे प्रतिनिधीत्व केलं तेव्हा मी लहान होते. हा सर्व प्रवास खूप मोठा होता ज्यामध्ये सर्व प्रकारचे क्षण पहायला मिळाले. गेलेली 23 वर्षे माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षण होते, असं मिताली राजने एका पत्रात म्हटलं आहे.
दरम्यान, मिताली राजने निवृत्तीची घोषणा केल्यानंतर बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी मितालीच्या योगदानाबद्दल कौतुक करत शुभेच्छा दिल्या आहेत. एक मोठी कारकिर्द संपुष्टात येत आहे. मिताली राज तुमच्या भारतीय क्रिकेटमधील योगदानाबद्दल धन्यवाद, असं जय शहा यांनी म्हटलं आहे. तसेच तुमच्या नेतृत्वामुळे राष्ट्रीय महिला नेतृत्त्वाला गौरव प्राप्त झाला, असंही जय शहा म्हणाले.
पहा ट्विट-
Thank you for all your love & support over the years!
I look forward to my 2nd innings with your blessing and support. pic.twitter.com/OkPUICcU4u— Mithali Raj (@M_Raj03) June 8, 2022
थोडक्यात बातम्या-
पंकजा मुंडेंचा पुन्हा पत्ता कट; विधानपरिषदेसाठी भाजपच्या उमेदवारांची नावं जाहीर
बारावीचा निकाल जाहीर; राज्याचा निकाल 94.22 टक्के
राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर, आघाडीचं मतांचं गणित बिघडलं?
“मविआचे चारही उमेदवार निवडून आणा, निवडणूक झाल्यावर आपण पुन्हा भेटू आणि पार्टी करू”
डायबिटीस असणाऱ्या पेशंटसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी!
Comments are closed.