बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आमदार अशोक पवारांच्या ‘एक हात मदतीचा’, आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद; 28 ट्रक कोकणाकडे रवाना!

पुणे | गेल्या काही महिन्यात कोकणात महापुर आल्याने अनेक ठिकाणी जीवीतहानी तसेच वित्तहानी झाली. कोकणातील अनेक नागरिकांना मोठ्या प्रमाणात संकटाचा सामना करावा लागत आहे. अशातच कोकणात मदतीचा ओघ चालू असताना शिरूरचे आमदार अशोक पवार आणि जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सुजाता अशोक पवार यांच्या रावलक्ष्मी फांउडेशनने एक हात मदतीचा असं आवाहन केलं होतं.

सामाजिक भावनेतून केलेल्या आवाहनाला नागरीकांनी चांगला प्रतिसाद दाखवला आहे. महापुरामुळे अतिवृष्टीग्रस्त लोकांनासाठी संसारोपयोगी लागणाऱ्या वस्तू पाठवल्या आहेत. यात 49 संसारपयोगी वस्तूंसह 28 ट्रकभरून दहा हजार पाकीट मदत गाड्यांच्या ताफ्यातून कोकणात पाठवण्यात आली आहे.

महापुरात अंदाजे 137 लोकांना जीव गमावावा लागला होता. तर जवळपास 75 जण बेपत्ता झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. त्यावेळी सरकारने वेळीच सावध भूमिका घेऊन अनेक ठिकाणाहून नागरिकांंच स्थलांतर करण्यात आलं होतं. त्यामुळे देशातुन तसेच राज्यातून अनेक सामाजिक संस्था, संघटनांनी कोकणातील पुरग्रस्त लोकांसाठी मदत पाठवली होती.

दरम्यान, रावलक्ष्मी फांउडेशनतर्फे पाठवण्यात आलेली मदत लाख मोलाची आहे. महापुराच्या तडाक्यात सापडलेल्या लोकांना नव्याने उभारी मिळण्यासाठी ही मदत अतिशय महत्वाची ठरणार आहे. तर मागील काही दिवसांमागे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी कोकण दौरा केला होता.

थोडक्यात बातम्या-

“रानडे इन्स्टिट्यूटवर दरोडा घालण्याचा प्रयत्न सुरुय, आम्ही तो हाणून पाडू”

रानडे इन्स्टिट्यूटच्या स्थलांतराचा प्रयत्न हाणून पाडू- उदय सामंत

‘त्या’ न्यूड फोटोमुळे राधिका आपटे सोशल मीडियावर ट्रोल!

राज कुंद्राच्या अडचणीत आणखी वाढ; आता आणखी एक टीम करणार चौकशी

राज्यातला डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका वाढला; मृत्यूच्या संख्येत होेतेय वाढ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More