आता गावोगावी लागणार आमदार बच्चू कडूंची राहुटी!

अमरावती | प्रहारचे डॅशिंग आमदार बच्चू कडू सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर कायमच लढताना दिसतात. नवीन वर्षाच्या सुरुवातीला असाच सर्वसामान्यांसाठीचा उपक्रम घेऊन ते आपली राहुटी गावोगावी टाकणार आहेत. 

‘आमदाराची राहुटी आपल्या गावी’, असं या उपक्रमाचं नाव आहे. 1 जानेवारी ते 6 फेब्रुवारीदरम्यान अचलपूर आणि चांदूरबाजार तालुक्याच्या विविध गावांमध्ये या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. 

36 शासकीय कार्यालयं 36 ट्रकमध्ये टाकून ती गावोगावी जातात. एरवी आठवडा-महिनाभर वाट पाहावी लागणारी कामं या उपक्रमात तासाभरात मार्गी लागतात. गेल्या वर्षी याच उपक्रमाद्वारे तब्बल 48 हजार प्रकरणं निकाली लागली होती. 

बच्चू कडूंच्या फेसबुक पेजवरुन साभार…