बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…तो कुत्रा म्हणजे भास्कर जाधव’, विधानसभेत पुन्हा एकदा राडा

मुंबई | हिवाळी अधिवेशनात (Winter Session) विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलीची जुंपली आहे. विधानसभेच्या बाहेर भाजप आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांनी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackrey) यांच्यावर टीका केली होती. या मुद्द्यावरून विधानसभेत  राजकारण पेटलं होतं. त्यानंतर शिवेसेनेचे आमदार भास्कर जाधव (MLA Bhaskar Jadhav) यांनी नितेश राणेंना चांगलंच धारेवर धरलं.

मागील अधिवेशनावेळी मी तालिका अध्यक्ष होतो. तेव्हा फडणवीस साहेब तुम्ही विधानभवनाबाहेर अभिरूप विधानसभा भरवली होती. तेव्हा नितेश राणे म्हणाले होते. भास्कर जाधव म्हणजे काय? त्याला कुणीतरी सांगितलं दोन बिस्किटं देतो, जा त्याला चावून ये. त्याला चावणारा कुत्रा म्हणजे भास्कर जाधव, असं सांगत भास्कर जाधवांनी विधानसभेत नितेश राणेंवर घणाघात केला.

मला फडणवीस, चंद्रकांत पाटील यांना प्रश्न विचारायचा आहे. त्याचवेळी नितेश राणेंना चंद्रकातं दादांनी विचारायला हवं होतं. राष्ट्रवादी आणि काँग्रसचे आमदार भांडत असताना तात्कालीन अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांन 19 जणांना निलंबित केलं होतं. तेव्हा फडणवीसांनी मला किती बिस्किटं खायला घातली होती, असंही जाधव यावेळी म्हणाले आहेत.

दरम्यान, शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी आदित्य ठाकरेंच्या अपमानाचा मुद्दा मांडला होता. यावेळी भास्कर जाधव यांनी नितेश राणेंवर निशाणा साधण्यास सुरुवात केली. यावेळी भास्कर जाधव यांनी मागच्या अधिवेशनावेळी नितेश राणेंनी केलेल्या वक्तव्याची आठवण करून दिली. त्यानंतर अधिवेशनाच एकच गदारोळ माजला होता.

थोडक्यात बातम्या-

“…तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू शकते”

अधिवेशनात कोरोनाचा कहर, ‘इतक्या’ जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर

‘मोहनदास करमचंद गांधीनी सत्यानाश केला’; कालीचरण महाराजाचं संतापजनक वक्तव्य

…अन् खासदार नवनीत राणा महिलांसोबत धावू लागल्या; पाहा व्हिडीओ

विधानसभा अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार?, काँग्रेसमधील घडामोडींना वेग

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More