बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पेट्रोल पंपावर आमदाराची फसवणूक, डिझेल भरल्यावर काही अंतरावरच बंद पडली गाडी

मोतीहारी | देशात दिवसेंदिवस महागाई गगनाला भिडत आहे. महागाईमुळे जनसामान्यांचं कंबरडं मोडलं आहे. देशभरात पेट्रोल डिझेलचे भाव सतत वाढत आहेत. तर पेट्रोलचे दर शंभरी पार गेले आहेत. देशभरात पेट्रोल डिझेलच्या दरवाढीमुळे विरोधकांनी आंदोलनं केली तरी भाववाढ कमी होत नाहीये. यातच पेट्रोलपंपावर बऱ्याचदा ग्राहकांची फसवणूक होत असल्याचं पहायला मिळतं. पण आमदाराची फसवणूक झाल्याची घटना आता समोर आली आहे.

बिहारमधीस एका पेट्रोल पंपावर चक्क आमदारालाच गंडवण्यात आलं आहे. बिहारच्या सिकटामधील भाकपचे आमदार विरेंद्र प्रसाद गुप्ता यांची पेट्रोल पंपावर फसवणूक झाली आहे. गुप्तांनी त्यांच्या स्कार्पिओ गाडीत 51 लीटर डिझेल भरल्यानंतर त्यांची गाडी काही अंतरावरच बंद पडली.

आमदार महोदय हे सिकटावरून पाटना येथील कृषी विभागाच्या बैठकीसाठी जात होते. त्यांच्या गाडीतील डिझेल कमी होते, त्यामुळे त्यांनी राष्ट्रीय महामार्ग 28 वरील माँ विध्वासनी सर्व्हिस सेंटर वर गाडीत पेट्रोल पंपावर 51 लिटर डिझेल भरून काही अंतरावरच त्यांची गाडी बंद पडल्याने त्यांना संताप व्यक्त करावा लागला.

गाडीत डिझेल असतानाही गाडी बंद पडल्याने त्यांनी मॅकेनिकला बोलवलं असता त्यानंतर त्यांच्या गाडीत डिझेल ऐवजी पाणी असल्याचं समजलं. त्यांच्या या फसवणूकीचा त्यांनी पोलिसांत गुन्हा नोंदवला आहे. गुप्तांच्या गाडीतील डिझेल जप्त करत पेट्रोल पंपावर फसवणूकीचा गुन्हा नोंदवला आहे.

थोडक्यात बातम्या –

2 खेळातील 2 दिग्गजांची होणार भेट???; कोहली-रोनाल्डो मँचेस्टरमध्ये भेटण्याची शक्यता

बाबो! किंग कोब्रा सर्पमित्रावर गेला धावून, फणा पाहून तुमच्याही अंगावर येईल काटा, पाहा व्हिडीओ 

“राणे कुटुंबीय म्हणजे येड्यांची जत्रा”

1 नोव्हेंबर पासून ‘या’ स्मार्टफोन, अॅन्ड्रॉईडफोनमधून व्हॉट्सअॅप सपोर्ट बंद होणारकोरोनाबाबत

केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावरून किशोरी पेडणेकरांचा यु टर्न; म्हणाल्या…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More