बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

डीएसकेंना खरोखर आमदार चावला का?, आता नवीनच माहिती आली समोर

पुणे | येरवडा कारागृहात असलेले प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी यांचा बँक घोटाळ्यातील एका आमदाराने चावा घेतल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. आता याप्रकरणी एक नवीनच माहिती समोर आली आहे. येरवडा कारागृह प्रशासनाने याबाबत खुलासा केला आहे.

“डीएस कुलकर्णी साधारणपणे २० दिवसांपूर्वी घसरून पडले होते, ही घटना घडल्यानंतर त्यांच्या पायाला दुखापत झाली होती, त्यासाठी त्यांना पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सध्या त्यांची प्रकृती उत्तम असून ते सुखरूप आहेत, मात्र सोशल मीडियात सध्या फिरत असलेली माहिती चुकीची आणि खोडसाळपणे पसरवली गेली आहे”, असं कारागृह अधीक्षक राणी भोसले यांनी एका वर्तमानपत्राच्या न्यूज पोर्टलला सांगितलं आहे.

नेमका काय प्रकार व्हायरल झाला होता?

येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या आमदाराने दुसऱ्या कैद्याच्या हाताचा चावा घेतल्याची धक्कादायक माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली होती, तसेच एका वर्तमानपत्राच्या बातमीचे कात्रण देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. या आमदाराने एवढ्या जोरात चावा घेतला की त्या कैद्याला उपचारासाठी ससून रुग्णालयात हलवावे लागले तसेच चावा घेतलेला कैदी हा एक मोठा बांधकाम व्यावसायिक आहे. आमदार आणि बांधकाम व्यावसायिक या दोघांमध्ये यापूर्वीही वाद झाले आहेत, अशी माहिती देखील या पोस्टमध्ये व्हायरल झाली होती.

या घटनेमुळे येरवडा कारागृहातील व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं. मात्र आता कारागृह प्रशासनाने मात्र अशी काही गोष्ट घडलीच नसल्याचं म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“तेव्हा भाजप सत्तेत असती तर काश्मीर, जूनागढ, हैद्राबाद संस्थानांना पाकिस्तानला जा असं…”

“परिवहन मंत्री केवळ मुख्यमंत्र्यांचे कलेक्टर आहेत”

साताऱ्यात राडा, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीच राष्ट्रवादीचं कार्यालय फोडलं

भाविकांची प्रतिक्षा संपली; सिद्धीविनायक मंदिराचे दरवाजे अखेर उघडले

मनसेला मोठा धक्का, पुण्यातील हा दिग्गज नेता पक्ष सोडण्याची शक्यता

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More