Loading...

आमदार महेश लांडगेंनी मागितला ‘एक हात मदतीचा’; नागरिकांचा उदंड प्रतिसाद!

पुणे |  कोल्हापूर सांगलीच्या पूरग्रस्तांसाठी आमदार महेश लांडगे यांच्या ‘एक हात मदतीचा’ या उपक्रमाला भोसरीकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. पन्नास वाहनांमध्ये बसेल एवढं अन्नधान्य, कपडे, खाद्यपदार्थ, जीवनावश्यक वस्तू सांगली कोल्हापूर भागात पाठवण्यात आल्या आहेत.

महेशदादा स्पोर्ट्स फाऊंडेशन, सांकोसा मित्रमंडळ, अविरत श्रमदान आणि अशा बऱ्याच संघटनांनी या कामात महेश लांडगे यांना सहकार्य करत मदत केली आहे.

Loading...

सांगलीचे सुहास पाटील यांनी महेश लांडगे यांना मदत मागितली होती. त्यानुसार लांडगे यांनी ‘एक हात मदतीचा’ नावाने उपक्रम चालू केला आणि लोकांनी देखील भरभरून प्रतिसाद दिला.

दरम्यान, सांगली कोल्हापुरातला पूर ओसरण्यास हळूहळू सुरूवात झाली आहे. परिस्थिती पूर्वपदावर येण्यास आणखी 24 तास लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-राज्यासाठी 6800 कोटी रूपयांची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार- मुख्यमंत्री फडणवीस

-मुख्यमंत्री सहायता निधीसाठी राष्ट्रवादीकडून 50 लाखांची मदत

-मुख्यमंत्र्यांसहित सर्व मंत्री पूरग्रस्तांना देणार एका महिन्याचा पगार

Loading...

-“प्रार्थनेसाठी जोडलेल्या 2 हातांपेक्षा मदतीसाठी सरसावलेला 1 हात कधीही महत्वाचा”

-“अन् त्या महत्वाच्या क्षणी काश्मिर भारताचा भाग नसेल”

Loading...