महाराष्ट्र मुंबई

राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याची भावाविरोधात विधानसभा निवडणूक लढण्याची तयारी

शहापूर | विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वाडा-शहापूरचे आमदार पांडुरंग बरोरा हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यांच्या या निर्णयावर त्यांचे चुलत भाऊ भास्कर बरोरा यांनी कडाडून विरोध केला आहे.

जर त्यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली तर मी स्वत: त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल करेल, असा भास्कर बरोरा यांनी सांगितलं आहे.

शहापूरचे राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या पांडुरंग यांनी मंगळवारी आमदार पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्याने राष्ट्रवादीला ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का बसला आहे.

दरम्यान, पांडुरंग बरोरा हे 2014 च्या मोदी लाटेतही राष्ट्रवादीकडून निवडून आलेले एकमेव आदिवासी आमदार आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-‘RSS’चा राष्ट्रनिर्मितीशी काय संबंध?- अशोक चव्हाण

-“सुजय विखेंनी निवडणुकीपुरता वापर करून फसवणूक केली”

-विधानसभेला बच्चू कडूंची शिवसेना-भाजपशी युती?

-विधानसभा लढण्याबाबत सुरेखा पुणेकर यांची मोठी घोषणा

-‘आषाढीच्या मुहूर्तावर राष्ट्रवादीच्या ‘पांडुरंगाच्या’ हातात भगवी पताका’

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या