Top News

…तर तुमच्या नेत्यांनाही लगाम घाला; रोहित पवारांचा भाजपला सल्ला

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना करणाऱ्या पुस्तकावरील वादावर उलटसुलट प्रतिक्रिया सुरूच आहेत. पुस्तकाच्या वादामुळे भाजपला रोषाला सामोरं जावं लागलं. या वादावरून आता आमदार रोहित पवार यांनीही भाजपला खडेबोल सुनावले आहेत.

तुमचे नेते लोकभावनेला न जुमानता वरिष्ठांना अंधारात ठेवून वागत असतील, तर त्यांनाही लगाम घाला, असा सल्ला रोहित पवार यांनी भाजपला दिला. जय भगवान गोयल लिखित ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरून वाद उफाळून आला. राजकीय नेत्यांसह लोकांनी यावर नाराजी व्यक्त करत भाजपावर टीका केली.

पुस्तकाच्या वादावरून केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी हे पुस्तक मागे घेत असल्याची माहिती ट्विट करून दिली. त्यांचं ट्विट रिट्विट करून रोहित पवार यांनी यांनी भाजपला सुनावलं आहे.

दरम्यान, पुस्तकावर बंदी आणावी अशीही मागणी अनेकांनी केली आहे. मराठा समाजाने याबाबत मराठा समाजाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या