बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“तुमच्याप्रमाणे रेमडेसिवीर इंजेक्शन पक्ष कार्यालयात लपवून ठेवलं नाही”

मुंबई | राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रवादी वेलफेअर फंडच्यावतीने रेमडेसिवीर इंजेक्शनचं वाटप केलं होतं. तर त्याआधी भाजपच्या गुजरातमधील पक्ष कार्यालयात रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा आढळला होता. यावरून राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपवर टीका केली होती. यावरून केलेल्या टीकाला विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी उत्तर दिलं होतं. तर आता प्रविण दरेकर यांच्या टीकेला  रोहित पवार यांंनी जोरदार पलटवार केला आहे.

सन्माननीय प्रविण दरेकर साहेब रेमडेसिवीर बाॅक्स हे शरद पवार आणि राष्ट्रवादी वेलफेअर निधीतून सोलापूर व इतर जिल्ह्यातील गरीब,गरजू रुग्णांना प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून मोफत देता यावेत,यासाठी दिले आहेत. तुमच्याप्रमाणे हे औषध पक्ष कार्यालयात लपवून ठेवलं नाही, असा टोला रोहित पवार यांनी लगावला.

सर्वसामान्यांना शक्य ती मदत करता यावी म्हणून सर्वांसमोर हे औषध दिलं,पण आपल्यासारख्या जबाबदार पदावरील नेत्याकडून चोरीबाबत झालेला उल्लेख दुर्दैवी आहे आणि असे प्रश्न विचारण्यापेक्षा रेमडेसिवीरचा तुटवडा होऊ शकतो, हे माहीत असूनही आजवर निर्यात का सुरु ठेवली याचं उत्तर केंद्राकडून घ्या, असा सल्ला देखील त्यांनी रोहित पवार यांनी प्रविण दरेकर यांना दिला.

रेमडेसिवीर बाबत “आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट”, अशी भूमिका नवाब मलिक यांनी घेतल्याचं दिसून येत आहे. आमदार रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांना मोफत दिलेले रेमडिसिवीर चोरून आणले आहेत का? याबाबत नवाब मलिक यांनी स्पष्टीकरण द्यावं, असं पलटवार प्रविण दरेकर यांनी नवाब मलिक यांच्यावर केला होता.

थोडक्यात बातम्या-

खेसारीलालच्या नव्या गाण्यानं केला कहर, काही तासात 4 कोटी व्ह्यूज!

असापण फ्रॅाड!; फेसबुक लाईव्ह केलं तर एका झटक्यात 26 हजारावरुन बिलाची रक्कम झाली 6 हजार!

“महाराष्ट्रात लोकशाही नाही तर ‘लॅाकशाही’ आहे, 2 मे ला सर्वांना धक्का बसेल”

शिवसेनेनं भाजपच्या देवेंद्र फडणवीसांपुढे ठेवला ‘हा’ नवा पर्याय!

5 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करुन हत्या, गावकऱ्यांनी आरोपीला रंगेहाथ पकडलं

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More