महाराष्ट्र मुंबई

अमित ठाकरे आरोग्यमंत्री राजेश टोपेंच्या भेटीला; ‘या’ चार मुद्द्यांवर चर्चा

मुंबई | मनसे नेते अमित ठाकरे यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भेट घेतली आहे. ‘जेतवन’ या शासकीय निवासस्थानी झालेल्या या बैठकीत कोरोनाबद्दल चार प्रमुख मुद्द्यांवर चर्चा झाली आहे.

राज्यात कोरोना आणि अन्य उपचारासांठी जी रुग्णालय कार्यरत आहेत, त्यांच्या बेड्सची क्षमता स्पष्टपणे नागरिकांना कळावी यासाठी एक अॅप विकसित करावं, बंधपत्रित वैद्यकीय अधिकारी आणि बंधपत्रित अधिपरिचारिका यांच्या पगारातील कपात रद्द करुन त्यांचा पगार पूर्ववत करावा, प्रत्येक रुग्णाला कोणत्याही परिस्थितीत अॅम्ब्युलन्स उपलब्ध करुन द्यायला हवी, प्रत्येक रुग्णालयात पोलीस कर्मचाऱ्यांसाठी काही बेड्स आरक्षित ठेवावेत. तसेच त्यांचा संपूर्ण वैद्यकीय खर्च शासनानेच करावा या मुद्द्यांवर अमित ठाकरे यांनी राजेश टोपेंशी चर्चे केली आहे.

अमित ठाकरे यांनी मांडलेल्या या सर्व विषयांवर राजेश टोपे यांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला. तसेच हे सर्व विषय लवकरात लवकर मार्गी लावू असे आश्वासनही राजेश टोपे यांनी अमित ठाकरेंना दिलं.

दरम्यान, अमित ठाकरे यांनी यापूर्वीही डॉक्टरांच्या मानधनात कपात होणार नाही याची काळजी घ्यावी, अशा आशयाचं पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिलं होतं.

ट्रेंडिंग बातम्या-

पुण्यातील ‘हा’ भाग नवा कंटेन्मेंट परिसर घोषित; एकाच दिवशी सापडले 19 कोरोनाबाधित रुग्ण

आम्हाला डोमकावळे म्हणताय, जनता तुम्हाला लबाड लांडगे म्हणते; शेलारांची टीका

महत्वाच्या बातम्या-

…तर महाराष्ट्रानं भाजपची पाठ थोपटली असती; भाजपच्या आंदोलनावर संजय राऊत संतापले

राज्यात आज कोरोनाचे 2940 नवीन रुग्ण; पाहा तुमच्या भागात किती?

युवा पत्रकाराचा नवा आदर्श; ‘या’ कारणामुळे मुख्यमंत्र्यांनीही थोपटली पाठ!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या