राज ठाकरे तुमचे नगरसेवकच आमच्याकडून हफ्ते घेतात, काय कारवाई करणार?

डोंबिवली | मनसेचे नगरसेवकच आमच्याकडून हफ्ते घेतात, मनसे प्रमुख राज ठाकरे त्यांच्यावर काय कारवाई करणार?, असा सवाल फेरीवाला संघटनेने विचारला आहे. डोंबिवलीत आज फेरीवाला संघटनेचा मेळावा पार पडला. 

फेरीवाला संघटनेनं हफ्ता घेणाऱ्यांची नावंही जाहीर केली आहेत. केडीएमसीतील विरोधी पक्षनेते मंदार हळबे आणि नगरसेवक राहुल चितळे आमच्याकडून हफ्ते घेतात असं फेरीवाला संघटनेनं म्हटलंय. तसेच त्यांच्यासंदर्भात पुरावे असल्याचा दावाही केलाय. 

पालिकेच्या फेरीवाला विरोधी पथकावरही त्यांनी आरोप केले. वरपासून खालपर्यंत सारे अधिकारीही पैसे घेतात, असा आरोपही त्यांनी केला.