Loading...

मनसेची राधाकृष्ण विखेंवर बोचरी टीका; ‘स्वार्थही ओशाळला असेल’…

मुंबई |  साडे चार वर्ष विरोधी पक्ष नेतेपद भुषवलेले ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी रविवारी कॅबीनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. या नंतर त्यांच्यावर विरोधी पक्षांकडून जोरदार टीका होताना दिसून येत आहे. मनसेने देखील त्यांच्यावर बोचरी टीका केली आहे.

राधाकृष्ण विखेंच्या भाजपात जाण्याने स्वार्थही ओशाळला असेल, असा टोला मनसे नेते अनिल शिदोरे यांनी विखे पाटील यांना लगावला आहे.

Loading...

पावणेपाच वर्ष विरोधी पक्षनेतेपदावर राहून सत्ताधाऱ्यांना सोयीस्कर राजकारण करणं. नंतर ऐन निवडणुकीच्या आधी मुलाला पक्षात पाठवून नंतर आपणच मंत्रीपद पदरात पाडून घेणं ह्यानं महाराष्ट्राबरोबर स्वत: स्वार्थही ओशाळला असेल, असं शिदोरे म्हणाले आहेत.

दरम्यान, राधाकृष्ण विखेंनी रविवारी झालेल्या मंत्रीमंडळ विस्तारात कॅबीनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्याकडे मुख्यमंत्र्यांनी गृहनिर्माण खात्याची जबाबदारी सोपवली आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या

-मंदिरात चोरी केल्याच्या संशयावरुन चिमुकल्याला गरम टाईल्सवर बसवलं

Loading...

-पाकिस्तानविरुद्धचा सामना जिंकूनही भारतीय संघाचं टेंशन वाढलं

-रोहित शर्मानं आपल्या धडाकेबाज शतकाचं श्रेय दिलं समायराला!

-भारताने पाकिस्तानवर केला दुसरा स्ट्राईक- गृहमंत्री अमित शहा

-वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचा धुव्वा उडवण्याची परंपरा कायम

Loading...