महाराष्ट्र मुंबई

मनसेनं सुरु केली ‘पेंग्विन्स गेम्स’ नावाची वेब सिरिज!

मुंबई | मनसेनं एक नवी वेब सीरिज लाँच केली आहे. ‘पेंग्विन गेम्स’ या नावाखाली एका वेब सीरिजला सुरूवात केली आहे. या वेब सीरिजद्वारे मनसेनं वरळीतील सामान्य नागरिकांना ज्या प्रश्नांना सामोरं जावं लागत आहे ते मांडण्याचा प्रयत्न केला आहे. टाईम्स ऑफ इंडियानं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

फेसबुकवर सुरू करण्यात आलेल्या या वेब सीरिजच्या पहिल्या भागात वरळी भागात असलेल्या प्रेम नगर येथील पाणी प्रश्न आणि सॅनिटायझेनची बिकट अवस्था मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. स्थानिक आमदार आणि सत्ताधारी पक्ष हे केवळ वरवरच्या मुद्द्यांवरच लक्ष देत असल्याचं दिसून येत आहे, असं मत मनसेचे संतोष धुरी यांनी व्यक्त केलं.

प्रेम नगरच्या रहिवाशांकडून आम्हाला उत्तम प्रतिसादही मिळाला आहे. शौचलांना दरवाजे नसणं, पाणी प्रश्न असे अनेक प्रश्न त्या ठिकाणी आहेत, असं धुरी म्हणाले.

दर पंधरा दिवसांनी या वेब सीरिजचा एक भाग प्रदर्शित केला जाणार आहे. याचं प्रसारण सोशल मीडियाच्या माध्यमातून केलं जाईल, असं संतोष धुरी यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

खळबळजनक! नालासोपाऱ्यात घराबाहेर पाण्याचा पाईप लावण्यासाठी गेलेल्या मुलीला उचलून तिच्यावर बलात्कार

सीरम इंस्टिट्यूटचा मोठा करार; फिलीपींस सरकारला इतक्या कोटी कोविशिल्ड लसीचा पुरवठा करणार

इच्छा नसताना दबावामुळे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्विकारली; नितीश कुमारांचा खुलासा

भारतीय खेळाडूंवरील वर्णद्वेषी टीकेवरुन सचिन तेंडुलकरचा संदेश, म्हणाला…

कृषी कायद्यांना स्थगिती मिळणार?; शेतकरी आंदोलनाबाबत सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या