मुंबई | ईडीने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नोटीस पाठवल्यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांसह मनसे नेत्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मनसे नेते अनिल शिदोरे यांनी राज ठाकरेंना पाठवण्यात आलेल्या नोटीसीवर निषेध व्यक्त करत राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.
ह्या सरकारनं फक्त राजकीय कार्यकर्त्यांवर आकसानं चौकशीचा ससेमिरा लावला असं नाही तर मराठवाडा आणि विदर्भाच्या दुष्काळी भागात गोरगरीबांसाठी काम करत असलेल्या शेकडो संस्था काहीतरी खुसपट काढून यांनी बंद केल्या आहेत, असा गंभीर आरोप शिदोरे यांनी सरकारवर केला आहे.
सगळ्याच संस्था त्यांनी बंद केल्या नसल्या तरी त्यांच्या विचारांच्या संस्था नसलेल्या आणि त्यांना अंकित नसलेल्या निवडक विचारांच्या संस्था त्यांनी बंद केल्या आहेत, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांना पाठवलेली नोटीस ही सूडाच्या राजकारणाचं उदाहरण आहे, असं विरोधी पक्षातल्या नेत्यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“देवांचा राजा इंद्र; महाराष्ट्राचा राजा देवेंद्र”
-‘आघाडी-बिघाडी’ बंद करा; राष्ट्रवादीच्या नेत्यांचं पोलीस आयुक्तांना निवेदन
-चूक नसेल तर घाबरण्याचं कारण नाही… मात्र चूक नसेल तर भोगावं लागेल- देवेंद्र फडणवीस
-वादग्रस्त ट्वीटनंतर शेहला रशीद यांच्या अटकेची मागणी
-“भाजप म्हणजे डोळे मिटून दूध पिणारे मांजर; माझा नवरा घाबरणारा नाही”
Comments are closed.