बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मनसेनं अमोल मिटकरींना बिस्कीट आणि श्वान दिलं गिफ्ट!

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये महाराष्ट्रातील जातीय राजकारणावर भाष्य केलं होतं. राष्ट्रवादीच्या जन्मानंतर राज्यात जातीपातीचं राजकारण वाढलं आहे, असा आरोप त्यांनी केला. यानंतर, राज ठाकरेंना शरद पवारांनी त्यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांचे साहित्य वाचण्याचा सल्ला दिला होता. यानंतर मनसे आणि राष्ट्रवादीतील वाद वाढताना दिसत आहे.

राज ठाकरे यांच्यावर अमोल मिटकरींनी केलेल्या टीकेमुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. आता अमोल मिटकरींना मनसेने बिस्कीट आणि श्वान भेट म्हणून दिलं आहे. मिटकरींच्या विरोधात मनसे कार्यकर्त्यानी घोषणाबाजी केली आहे. मनसे काय आहे हे मिटकरींना दाखवून देऊ, असा इशारा मनसेनं दिला आहे.

राज्यात अमोल मिटकरी नावाचा बाजारू विचारवंत आला आहे. मिटकरी यांनी राज ठाकरे यांच्यावर परराज्यातील लोक आणि दक्षिण भारतीय, उत्तर भारतीय असा द्वेष निर्माण करून राष्ट्रदोहचा आरोप केला आहे. यावर राष्ट्रदोह म्हणजे काय हे मिटकरीनीं समजून घ्यावं. राष्ट्रदोही कोण आहे हे ठरवण्याचा अधिकार हा संविधानास आहे. मिटकरी हे संविधानापेक्षा मोठे झाले का?, असा प्रश्न मनसेचे पुण्यातील विभागप्रमुख जगदीश खांडेकर यांनी केला आहे.

दरम्यान, अमोल मिटकरीनीं मंत्रालयात जाताना आपल्या गाडीच्या काचा काळ्या रंगांच्या कराव्यात अन्यथा काचा फोडण्यात येतील, असा इशारा खांडेकर यांनी दिला आहे. त्यामुळे मनसे आणि मिटकरी यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे.

थोडक्यात बातम्या – 

“दोन मोठी माणसं बोलताना आपलं तोंड मिटून ठेवावं”

“…आता थांबणं शक्य नाही, शेतकऱ्यांनो पायातलं हातात घ्या”

सख्खा भाऊ पक्का वैरी!, अश्रफ घनींचा भाऊच तालिबान्यांना मिळाला!

“राज ठाकरेंनी बाबासाहेब आंबेडकरांचं ‘एनिहिलेशन ऑफ कास्ट’ पुस्तक वाचावं”

आम्हा बारामतीकरांना भल्या सकाळी काम सुरू करायची सवय लागलीये- अजित पवार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More