मनसेमध्ये अंतर्गत कलह, …म्हणून खुर्चीलाच घातले हार!

मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी पक्षसंघटनेत खांदेपालट केलाय. मात्र यामुळे मनसेतील नाराजी उफाळून आलीय.

राज ठाकरे यांनी गुरुवारी वाहतूक सेनेच्या नवीन पदाधिकाऱ्यांची नावे घोषीत केली. मात्र नवनियुक्त पदाधिकारी पदभार सांभाळण्यासाठी कार्यालयात वेळेवर पोहोचले नाहीत. तब्बल 2 तास वाट पाहू कंटाळलेल्या कार्यकर्त्यांनी अखेर खुर्चीलाच हार घातले. 

संजय जामदार यांनी यासंदर्भात फेसबुकवर पोस्ट लिहिली आहे. त्यांना वाहतूक सेनेचे अध्यक्ष होण्याची इच्छा होती. पण त्यांना डावलण्यात आल्यानं ते नाराज झाल्याचं कळतंय.