मुंबई | रस्त्यांवरील खड्ड्यांच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मनसे कार्यकर्त्यांनी मंत्रालयाबाहेरचा रस्ता खोदत आंदोलन केलं.
पावसाळा सुरु झाल्यापासून रस्त्यावर पडणाऱ्या खड्ड्यांमध्ये मोठी भर पडली आहे. या खड्ड्यांमुळे अपघात होऊन अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे या मुद्द्यावरुन मनसे आक्रमक झाली आहे.
सर्वसामान्यांना जो त्रास सहन करावा लागतो. तो त्रास अधिकारी आणि नेत्यांनाही व्हावा यासाठी मनसेने रात्री मंत्रालयाबाहेरील रस्त्यावर खड्डे खोदले. याप्रकरणी मनसेच्या 8 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-तो आंबा खाल्ल्याने पुत्रप्राप्ती होते; संभाजी भिडे आपल्या वक्तव्यावर ठाम
-…म्हणून रात्री साडेबारा वाजता विखे-पाटलांचा सभागृहात ठिय्या!
-मनुस्मृतीचा अभ्यास करुन बाबासाहेबांनी राज्यघटना लिहिली- संभाजी भिडे
-होय… भूगोलाच्या पुस्तकात गुजराती मजकूर छापण्यात आला, संबंधितांवर कारवाई करणार!
-…तर येत्या निवडणुकीत महादेव जानकराचं डिपाॅझिट जप्त करू!