ठाणे महाराष्ट्र

मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना जामीन मंजूर

ठाणे | सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात तळोजा कारागृहात बंदिस्त असलेल्या मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना आज जामीन मंजूर झाला आहे.

कोविडदरम्यान काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना घरी बसविल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या अविनाश जाधव यांच्यावर कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना ठाणे पालिका मुख्यल्यासामोर पोलिसांनी अटक केली.

अविनाश जाधव यांना 15 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला असल्याचं मनसेचे वकील राजेंद्र शिरोडकर यांनी सांगितलं. न्यायालयावर आमचा विश्वास आहे, अविनाश जाधव यांच्यावर राजकीय गुन्हे असून लोकशाहीच्या मार्गाने त्यांनी कोविडसाठी आंदोलन केले होते. त्यामुळे जनतेसाठी ही लढाई होती. पुढेदेखील अशीच लढाई जनेतेसाठी सुरू राहील, असं मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी सांगितलं.

ठाणे पोलिसांनी कोर्टाकडून अधिक वेळ मागितला होता. तर अविनाश जाधव यांच्या वकिलांनी जामिनासाठी युक्तिवाद केला. दोन्ही बाजूचे युक्तिवाद न्यायाधीश पी पी जाधव यांनी ऐकून घेतले आणि त्यांना जामीन मंजूर केला.

महत्वाच्या बातम्या-

पावसामुळे अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानातील छताचा भाग कोसळला

पाच दिवसात सोने दरात मोठी वाढ; पाहा काय आहे आजचा भाव…

परदेश शिष्यवृत्तीबाबत धनंजय मुंडे यांचा मोठा निर्णय

‘या’ तारखेपासून शाळा सुरु करण्याचा केंद्र सरकारचा विचार

सुशांत सिंहच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्यास रिया चक्रवर्तीचा विरोध, म्हणाली…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या