बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज ठाकरे बोलले आणि मनसे कार्यकर्त्यांनी ‘करुन दाखवलं’, पुण्यात मनसेची बॅनरबाजी

पुणे । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुण्यामध्ये आजपासून सदस्य नोंदणी सुरू झालीये. राज ठाकरेंचं पुण्यामध्ये ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत केलं गेलं.

नवी पेठेतील मनसे कार्यालयास ठाकरेंनी भेट दिली. या कार्यक्रमादरम्यान कार्यालयाबाहेर लावलेल्या एका बॅनरची पुण्यात तुफान चर्चा रंगलेली दिसली. या बॅनरवर, “आता भारत नाही, हिंदूंचा हिंदूस्थान” असं लिहीण्यात आलेलं. याचबरोबर ‘हिंदूराष्ट्र निर्मितीसाठी हिंदूजननायक’ असा देखील उल्लेख करण्यात आला आहे.

पाठिमागे भगव्या रंगात भारताचा नकाशाही होता. या भारताच्या भगव्या नकाशावर ‘हिंदूंचा हिंदूस्थान’ असंही लिहीलंय.

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More