Top News शिक्षण

प्रसिद्ध मॉडेल ते UPSC परीक्षेत ९३ वी रँक… , या तरुणीचा प्रेरणादायी प्रवास वाचून थक्क व्हाल..!

नवी दिल्ली | मंगळवारी लोकसेवा आयोग (यूपीएससी) परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला. यूपीएससीच्या मुख्य परीक्षेत एकूण २३०४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. त्यातील ८२९ विद्यार्थी अंतिम मुलाखतीसाठी निवडले गेले. सामाजिक माध्यमांवर ऐश्वर्या श्योराण (Aishwarya Sheoran) हे नाव चर्चेत आहे. कारणही तसेच आहे, तिने यूपीएससीमध्ये ९३ वी रँक मिळवली आहे….!

सामाजिक माध्यमांवर ऐश्वर्याचे जोरदार कौतुक होत आहे. तिच्या चाहत्यांनी हे यश संपादन केल्याबद्दल तिचे भरभरून कौतुक केले आहे. ऐश्वर्या श्योराण ही प्रसिद्ध मॉडेल आहे. मिस इंडिया या अधिकृत ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. त्यात लिहिलंय,”ऐश्वर्या श्योराण, फेमिना मिस इंडिया २०१६ ची अंतिम स्पर्धेतील स्पर्धक, कॅम्पस प्रिन्सेस दिल्ली २०१६, फ्रेशफेस विनर दिल्ली २०१५ मधील विविध स्पर्धांबद्दल तसेच यूपीएससीमध्ये भारतात ९३ वी रँक मिळवल्याबद्दल आम्हाला तुझा खूप अभिमान वाटतोय. हे यश संपादन केल्याबद्दल तुझे मनःपुर्वक अभिनंदन..!”

 

 

२०१५ साली देशात भारतीय वन सेवा परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश संपादन करून १२ वी रँक मिळवलेली नेहा श्रीवास्तव हिने ऐश्वर्याच्या यशाबद्दल ट्विट केलंय. त्यात लिहिलंय,”लैंगिकता रुढीवादीला आणि ‘सौंदर्य हे मूर्ख आहे’ या गोष्टी चुकीच्या सिद्ध केल्याबद्दल ऐश्वर्या श्योराण तुझे धन्यवाद. पुढच्यावेळी जेव्हा एखाद्या स्त्रीला फॅशनमध्ये रुची असेल, तेव्हा ती मुकी म्हणून कलंकित होणार नाही.”

 

 

पूर्व मिस वर्ल्ड व अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्या नावावरून ऐश्वर्याचे नाव ठेवण्यात आले होते. लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन करणे, हे ऐश्वर्याचे स्वप्न होते. ऐश्वर्याचे वडील कर्नल अजय कुमार हे एनसीसी तेलंगणा बटालियनचे लष्करी अधिकारी आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

पुराचा धोका ओळखून मंत्री हसन मुश्रीफांच्या जिल्हा प्रशासनाला या तातडीच्या सूचना

संयम ठेवलाय म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना भाजपचा सवाल, ‘संयम सुटला तर काय कराल?’

चीनमध्ये नव्या व्हायरसचा धुमाकूळ; तब्बल इतक्या लोकांना झालीय ‘या’ व्हायरसची लागण

जेव्हा कमळाचं राज्य येईल तेव्हाच…., राम मंदिर भूमीपूजनावर शत्रुघ्न सिन्हा यांचं ट्विट!

आदिवासी मुले, महिलांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची महत्त्वाची घोषणा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या