Top News देश

मोदी सरकारचं दुसरं आर्थिक पॅकेज; या क्षेत्रांना मिळणार मोठा दिलासा

नवी दिल्ली |  कोरोनाच्या संकटात मोदी सरकार दुसरं मोठं आर्थिक पॅकेज जाहीर करणार आहे. याची तयारी सरकारने सुरू केली आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे ज्या क्षेत्रांना मोठा फटका बसला आहे त्यांना या पॅकेजमधून दिलासा देण्याचा प्रयत्न आहे.

यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयानं एक समिती नेमली आहे. ही समिती सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, हवाई वाहतूक, कृषि आणि कृषी संबंधित उद्योगांच्या अडचणी जाणून घेत आहे. कृषी क्षेत्रासह इतर उद्योगांना मदत देण्यासाठी सरकार आर्थिक पॅकेजची घोषणा करण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान कार्यालयानं नेमलेल्या अभ्यास गटासोबत अर्थ मंत्रालय यासंदर्भात अभ्यास करत आहे. कोरोनाच्या काळात किती नुकसान सोसावं लागलं. त्यासंबंधातील  अभ्यास करून पॅकेज तयार करण्याचं काम सुरू आहे.

दरम्यान, पॅकेज तयार झाल्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत ते मांडले जाणार आहे. बैठकीत चर्चा झाल्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन पॅकेजची घोषणा करण्याची शक्यता आहे. या अगोदर पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतंर्गत 1 लाख 70 हजार कोटींच पॅकेज जाहीर केलं होतं.

ट्रेंडिंग बातम्या-

… तर गंभीर परिणाम भोगावे लागतील; डोनाल्ड ट्रम्प यांची भारताला धमकी

14 एप्रिलला लॉकडाऊन संपणार का?; आरोग्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य

महत्वाच्या बातम्या-

चालून थकलो आहे मला घ्यायला या… बीडच्या तरूणाचा वडिलांबरोबर अखेरचा संवाद अन्….

महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक फटका; मृतांची संख्या 52 वर

शेतकऱ्याच्या लेकीचा मदतीचा हात; गोरगरिबांना देणार स्वत:च्या शेतातली ज्वारी तसंच गरजेच्या वस्तू

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या