बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मोदी सरकारनं लसीकरणाची शंभरी साजरी केली, आता इंधन दरवाढीचीही शंभरी साजरी करावी”

नवी दिल्ली| देशात अद्याप कोरोनाची लाट संपलेली नाही. मात्र तरीही कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे नागरिकांच्या लसीकरणावर भर दिला जात आहे. यातच आता मोदी सरकार 100 कोटी लसीकरणाचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे आता मोदी सरकारकडून याविषयी आनंद व्यक्त केला जात आहे. अशातच आता काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी लसीकरण आणि इंधन दरवाढीवरुन मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

देशात लसीकरणाचा 100 कोटींचा टप्पा साजरा केल्यानंतर आता इंधन दरवाढीची शंभरीही साजरी करावी, असं म्हणत पी. चिदंबरम यांनी मोदी सरकारला खोचक टोला लगावला आहे.

काही आठवड्यांपूर्वीच लीटरमागे पेट्रोलच्या किंमती 100 रुपयांच्या पुढे गेल्या आहेत आणि आता डिझेलच्या किंमतीनं लीटरमागे 100 रुपयांचा टप्पा गाठलाय, असं म्हणत चिदंबरम यांनी इंधन दरवाढीवरुन संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये चांगलीच वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागत आहे. त्यामुळे नागरिकांसाठी इंधन दरवाढ मोठा चिंतेचा विषय बनला आहे.

थोडक्यात बातम्या – 

भारत कालची मॅच हरल्यानंतर पंजाबमध्ये काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण

परिक्षेत विद्यार्थ्याने लिहिलं असं काही की, वाचून शिक्षक गेले कोमात

मलिकांच्या आरोपांवर समीर वानखेडेंचं प्रत्युत्तर, म्हणाले ‘माझ्या मूळ गावी जाऊन…’

भारतीय संघाची चिंता वाढली! ‘हा’ प्रसिद्ध खेळाडू पोहोचला रूग्णालयात

एकीकडे पाकिस्तान मैदानावर इतिहास रचत होता, तर दुसरीकडे पाकिस्तानात 10 जणांचा मृत्यु झाला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More