नवी दिल्ली | मोदी सरकार कोरोना साथीच्या सामना करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी केला आहेे.
पी. चिदंबरम यांनी मोदी सरकारवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. ते BBCला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलत होते. तसेच मोदी सरकार निर्लज्ज, ते त्यांची चूक मान्य करणार नाहीत, असंही पी. चिदंबरम म्हणालेत.
पंतप्रधान आणि अर्थमंत्री वगळता सर्वांना माहीत होतं की भारताच्या अर्थव्यवस्थेचं संकट अधिकच खोलवर जाणार आहे. मोदी सरकारने जे करायला हवे होते ते केलं, असा कोणताही अर्थशास्त्रज्ञ मानत नाही, अशी टीका चिदंबरम यांनी केलीये.
दरम्यान, केवळ आरबीआयचा अहवाल वाचा. मोदी सरकारने साथीच्या आधी आणि दरम्यान काय केलं आणि आपण त्यांना अधिक वेळ द्यावा, असं आपणास वाटत असेल तर मी फक्त आपल्यासाठी दुःख व्यक्त करू शकतो. एकमात्र क्षेत्रात 3. टक्के वृद्धी झाली आहे. ते शेती, वनीकरण आणि मत्स्यपालन आहे, असं चिदंबरम यांनी सांंगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
‘मंदिर-मस्जीद उघडा अन्यथा….’; रामदास आठवलेंचा सरकारला इशारा
एक रोमांचक अनुभव; बिअर ग्रील्ससोबत आता ‘खतरोंके खिलाडी’ही दिसणार…!
फक्त एक चूक आणि तरुणीला मोजावी लागली ‘ही’ मोठी किंमत
दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींबद्दल जाणून घ्या ‘या’ काही खास गोष्टी
अंतिम सत्राच्या परीक्षा आता घरुनच देता येणार!
Comments are closed.