बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोदी सरकार ‘अॅक्शन मोड’वर ; आता ‘या’ गोष्टींवर मिळणार अनुदान

नवी दिल्ली | कोरोना काळात भारतीय अर्थव्यवस्था (Indian economy) डबघाईला आली होती. त्यावेळी सर्व उद्योगधंदे अनेक मोठमोठ्या कंपन्यांना मोठा आर्थिक त्रास सहन करावा लागला होता. आता कोरोनानंतर सर्वकाही सुरळीत होताना दिसत आहे, अशातच आता केंद्र सरकार देखील अॅक्शन मोडमध्ये दिसत आहे.

देशाच्या अर्थव्यवस्थेला पुन्हा सुरळीत करण्यासाठी आता केंद्र सरकार आता 2.5 लक्ष कोटी रूपये खर्च करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे आता उद्योगधंद्यांना आता सुगेचे दिवस येण्याची शक्यता आहे. मोदी सरकार आता काही गोष्टींवर सब्सिडी (Modi government will now give subsidy) देणार असल्याची माहिती समोर आली आहे.

केंद्र सरकार जो पैसा उभारणार आहे त्यामधून अन्न प्रक्रिया उद्योग आणि रासायनिक खते आणि औषधांवर सब्सिडी देण्याची शक्यता आहे. येत्या हिवाळी अधिवेशनात यावर प्रस्ताव देखील केंद्र सरकारकडून मांडला जाऊ शकतो. या सबसीडीमुळे केंद्रावरील खर्चाचा बोजा देखील वाढणार आहे.

दरम्यान, पंतप्रधान गरिब कल्याण अन्न योजनेच्या माध्यमातून गरिब लोकांना अन्न मिळावं, यासाठी योजना सुरू केली होती. कोरोना काळानंतर देखील ही योजना पुढील तीन महिने राबवण्यात आली होती. त्याचा बोजा देखील आता अर्थव्यवस्थेवर पडताना दिसत आहे.

थोडक्यात बातम्या –

“घरकोंबड्या ठाकरे सरकारच्या सल्ल्यानुसार कोमट पाणी पिऊन…”

“ते एक बंद षडयंत्रच होतं”, मोहन भागवत यांचं मोठं वक्तव्य

धक्कादायक! ‘या’ ठिकाणी सापडला कोरोनाचा नवा व्हेरिएंट

“उद्धव ठाकरे अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदावर राहणार असल्याची चर्चा म्हणजे…”

“मी पवार साहेबांवर प्रेम केलं, मी त्यांचा माणूस असं…”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More