बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोदी सरकारचा नागरिकांना धक्का, या गरजेच्या वस्तूंवरील GST वाढणार?

नवी दिल्ली | वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला आधीच कात्री लागली आहे. त्यात नागरिकांना जोरदार धक्का देत मोदी सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत आहे. मोदी सरकार गरजेच्या वस्तूंवरील वस्तू आणि सेवा कर (GST) वाढवण्याची शक्यता आहे.

जीएसटी परिषदेच्या पुढच्या बैठकीत सर्वात कमी असलेला कराचा टप्पा वाढवण्यासंदर्भात निर्णय होऊ शकतो. राज्यांच्या अर्थमंत्र्यांचा समावेश असलेली समिती जीएसटी परिषदेला अहवाल देऊ शकते. यात जीएसटीमधील कराचा सर्वात कमी असलेला टप्पा वाढवण्याची आणि तो तर्कसंगत करण्यासाठीची शिफारस यातून करण्यात येणार आहे.

जीएसटीचा 5 टक्क्यांचा टप्पा वाढवून तो 8 टक्के करण्याचा प्रस्ताव अर्थमंत्र्यांच्या समूहाने जीएसटी परिषदेसमोर ठेवला आहे. साखर, तेल, मसाले, कॉफी, चहा, काजू, मिठाई, नमकीन, अगरबत्ती, लाईफबोट, जीवन रक्षक औषधं, आयुर्वेदिक औषधं या 5 टक्के कर असलेल्या वस्तू आहेत. प्रस्ताव मंजूर झाला तर या वस्तूंवरील जीएसटी वाढेल.

दरम्यान, सर्वात कमी असलेल्या टप्प्यातील वस्तूंवरील कर 1 टक्का वाढवला तर सरकारला वर्षाच्या शेवटी 50 हजार कोटींचा महसूल मिळेल. महसूल वाढवण्यासाठी आणि कोरोनाकाळात झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी जीएसटीमध्ये हे बदल केले जाण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या-

‘..तोपर्यंत हे युद्ध सुरूच राहिल’, पुतिन यांचा युक्रेनला थेट इशारा

“…म्हणून शरद पवारांचा देवेंद्र फडणवीसांवर राग आहे”

“राज्यपालांना इथून हटवणं एका मिनिटाचं काम आहे”

मोठी बातमी! मोदी सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज

“निकाला आधीच मी येणार, मी येणार सांगत होते, पण आम्ही काय येऊ देतो”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More