मोठी बातमी! आणखी एक सरकारी कंपनी विकण्याचा मोदी सरकारचा निर्णय
नवी दिल्ली | मोदी सरकारने आणखी एक सरकारी कंपनी विकण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. एकमेव सरकारी हेलिककॉप्टर सेवा देणारी कंपनी मोदी सरकारने विकली आहे.
देशातील अनेक हेलिकॉप्टर अपघातांसाठी कुप्रसिद्ध असेलेली पवन हंस लिमिटेड कंपनी मोदी सरकारने विकली आहे. मोदी सरकारने पवन हंस लिमिटेड कंपनी स्टार-9 मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेडला विकली आहे. मोदी सरकारने ही कंपनी तब्बल 211.14 कोटी रूपयांना विकली आहे.
पवनहंस विकण्यापूर्वी सरकारने कंपनी तोट्यातून सावरण्याची योजना आखली होती. मात्र, कंपनी सतत आर्थिक संकटाचा सामना करत असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. त्यामुळे मोदी सराकरने अखेर या पवन हंस हेलिकॉप्टर प्रोव्हायडर कंपनी विकण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, पवनहंस ही देशातील एकमेव सरकारी हेलिकॉप्टर देणारी कंपनी होती जी पूर्णपणे नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या अंतर्गत येत होती. कालांतराने पवनहंस हेलिकॉप्टर अपघातांसाठी जास्त ओळखले जाऊ लागले.
थोडक्यात बातम्या-
“मशिदींवरील भोंगे काढायला सांगितले म्हणून हिरव्या उचक्या लागल्या”
“ज्यांच्यात क्षमता आहे असं वाटायचं त्यांनी व्यंगचित्रकला सोडून भोंग्यांचे राजकारण सुरू केलं”
“…तर MIM देखील गप्प बसणार नाही, बघू आम्हाला कोण थांबवतं”
पोस्टात नोकरीची सुवर्णसंधी, 10वी उत्तीर्ण आहात तर ही बातमी तुमच्यासाठीच
यंदाही चक्रीवादळ धडकणार, ‘या’ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा जारी
Comments are closed.