बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अफगाणिस्तानातील भारतीयांसाठी केंद्राची हालचाल??; उचललं ‘हे’ मोठं पाऊल!

नवी दिल्ली | अफगाणिस्तानात घडत असलेल्या घटनांवर सध्या संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. अनेक देशांचे नागरिक अफगाणिस्तानमध्ये अडकलेले आहेत. अनेक भारतीय देखील अफगाणिस्तानात अडकलेले असताना भारतीय वायुदलानं शौर्य दाखवत आतापर्यंत शेकडो भारतीयांना एअरलिफ्ट केलंय. अजूनही अनेक भारतीयांना सुरक्षित बाहेर काढण्याचं काम चालू आहे. त्यातच आता केंद्र सरकार मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे.

अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. येत्या गुरूवारी सकाळी 11 वाजता ही बैठक बोलवण्यात आली आहे. विरोधीपक्षासह इतर नेत्याचं मत जाणून घेऊन घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रीमंडळाची बैठक घेण्याची शक्यता आहे. या बैठकीत भारतीयांना सुटका करण्यासोबतच इतरही मोठे निर्णय घेतले जाणार असल्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.

तालिबानची सत्ता असलेल्या अफगाणिस्तानमध्ये आतापर्यंत घडलेल्या घडामोडीवर परराष्ट्र मंत्रालयानं सर्व राजकीय पक्षांना माहिती द्यावी, अशा सुचना पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आल्या आहेत. हिंदू, शीख आणि अफगाणी लोकांना मदत करण्याचं आश्वासन भारताने दिलं होतं. त्यामुळे सर्वपक्षीय बैठकीत हिंदू आणि शीख लोकांविषयी चर्चा देखील केली जाऊ शकते.

दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर आरोप केला होता. मोदी सरकार अफगाणिस्तानच्या परिस्थितीवर माहिती का देत नाही? असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला होता. त्यानंतर अफगाणिस्तानच्या मुद्द्यांवर गंभीर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलवल्याचं सांगितलं जातंय.

थोडक्यात बातम्या-

थेट मैदानात घुसून प्रेक्षकांचा राडा! फुटबाॅल सामन्यावेळी धक्कादायक घटना; पाहा व्हिडीओ

‘राज्य सरकारने दहीहंडीला परवानगी दिली नाही तर…’; आशिष शेलारांचा सरकारला इशारा

सरकारी मालमत्ता विकून मिळवा पैसे, अर्थमंत्री करणार ‘या’ योजनेची सुरुवात, पाहा व्हिडीओ

‘तालिबानी भारतासाठीही ठरू शकतात धोकादायक???’; शिया धर्मगुरू मौलानांचा भारताला गंभीर इशारा

नीती आयोगाच्या ‘त्या’ गंभीर इशाऱ्यावर राजेश टोपेंचं स्पष्टीकरण, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More