बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सहकार क्षेत्रासाठी मोदी सरकारचं मोठं क्रांतिकारी पाऊल; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार करण्यात आला आहे. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये 15 कॅबिनेट मंत्र्यांनी तसेच 28 राज्यमंत्री यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये महाराष्ट्रातून नारायण राणे यांच्यासह 4 जणांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. या मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी मोदी सरकारने एका नव्या मंत्रालयाची घोषणा केली आहे.

मंत्रिमंडळ विस्तारात पूर्वी मिनिस्ट्री ऑफ को-ऑपरेशन म्हणजेच केंद्रीय सहकार मंत्रालयाची नव्याने स्थापना करण्यात आली असून सहकार क्षेत्रासाठी मोदी सरकारने हा क्रांतीकारक निर्णय घेतला आहे. या मंत्रालयाचा कार्यभार आता गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे देण्यात आला असून अमित शहा यांच्याकडे आता मिनिस्ट्री ऑफ को-ऑपरेशनचा अतिरिक्त कार्यभार असणार आहे.

सहकार क्षेत्राची प्रशासकीय आणि कायदेशीर धोरणात्मक चौकट मजबूत करण्यासाठी सरकारने या नव्या मंत्रालयाची स्थापना केल्याची माहिती समोर येत आहे. ‘सहकारातून समृद्धी’ हा विचार डोक्यात ठेवून सरकारने या मंत्रालयाची स्थापना केली असल्याच्या चर्चा सुरु आहेत. हे मंत्रालय बहुराज्य सहकारी संस्थांचा विकास करण्यासाठी देखील काम करणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांसाठी इस ऑफ डूइंग बिझनेस ही प्रक्रिया अगदी सोपी आणि सुलभ व्हावी यासाठी सरकारने हे मंत्रालय स्थापन केला असून या मंत्रालयाची जबाबदारी नेमकी कोणाकडे जाणार याकडे सर्वांचे लक्ष होतं.  अखेरीस गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे या मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे.

 

थोडक्यात बातम्या 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More