बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोदींचा ममता बॅनर्जींवर निशाणा म्हणाले; ‘माता, माती आणि माणूसकी…’

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणूकीचं बिगूल वाजलं आहे. तृणमूल काँग्रेसला शह देण्यासाठी भाजपकडून आता पंतप्रधान नरेंद्र मोदी मैदानात उतरले आहेत. कोलकता येथील ब्रिगेड परेड मैदानावर आयोजित सभेत मोदींनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला आहे. परिवर्तनासाठी जनतेनं ममता बॅनर्जी यांच्यावर विश्वास ठेवला मात्र त्यांनी देशाचा विश्वासघात केला आहे, अशा शब्दात मोदींनी तृणमूलवर ताशेरे ओढले आहेत.

ब्रिगेड परेडवर बोलताना मोदी म्हणाले की, पश्चिम बंगालमध्ये येण्याचं भाग्य मला लाभले आहे. या ब्रिगेड मैदानानं अनेक देशभक्त पाहिले आहेत तसेच जनतेला वेठीस धरणारे लोकसुद्धा पाहिले आहेत. मात्र बंगालच्या जनतेनं अद्याप विकासाचा मार्ग मात्र कधी सोडला नाही. पश्चिम बंगालमधील स्थानिक स्वराज्य संस्थाना मजबूत करण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील राहू.

बंगालमध्ये आजही महिलांवर बलात्कार होत आहेत. जवळपास दहा वर्षांपासून अशी एकही महिला नसेल जी अत्याचाराच्या घटनेमुळं रडलेली नसेल. माता, माती आणि माणूसकीची बंगालमध्ये नक्की काय स्थिती आहे. हे आता सर्वांनाच ठाऊक झालं असेल, असा शब्दात ममता सरकारला टोला लगावायलाही मोदी यावेळेस विसरले नाहीत.

ममता सरकारच्या आधी बंगालवर डाव्यांनीही राज्य केलं होतं. डाव्यांच्या विरोधात ममतांनी बंगालच्या विकासाची घोषणा केली. मात्र बंगालच्या लोकांच्या आयुष्यात नक्की किती फरक पडलाय?, असा प्रश्नही मोदींनी यादरम्यान उपस्थित केला आहे. कोलकता शहरात स्टार्टअपचे वातावरण करण्यात येणार असून मेट्रोचे उर्वरीत कामही लवकरच करण्यात येईल, असंही मोदींनी यावेळेस जाहिर केलं.

थोडक्यात बातम्या-

काय सांगता! खेकडा चक्क सिगरेट ओढतोय; ‘हा’ व्हिडीओ पाहून सारं जग झालंय थक्क

अनिल अंबानी यांच्या अडचणीत वाढ; रिलायन्स होम फायनान्स डिफॉल्टर यादीत

“काँग्रेसनं कर्नाटकला IT Hub बनवलं, भाजप कर्नाटकला Porn Hub बनवतंय”

सरसंघचालक मोहन भागवत यांनी घेतली कोरोनाची लस

कोणी काहीही म्हणू दे, महाराष्ट्र फर्स्ट हेच धोरण ठेवा- राज ठाकरे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More