बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“सत्तर वर्षांची कमाई मोदींनी विकून टाकली”, पाहा राहूल गांधींचा व्हिडीओ

नवी दिल्ली | देशात कोरोना महामारीमुळे अनेक लोकांचे रोजगार बुडालेत. कोरोना काळात अनेक लोकांचे हाल झालेत. महागाई, बेरोजगारी या मुद्द्यांवरून केंद्र सरकारवर विरोधी पक्षाकडून सतत टीका होत आहे. केंद्र सरकारच्या नॅशनल मोनेटाइजेशन पाइपलाईन योजनेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकार निशाणा साधला आहे.

70 वर्षात देशात काहीही झालं नाही, असा भाजपने नारा दिला होता. काल केंद्रीय अर्थमंत्र्यांनी देशात जे काही होतं ते सर्व विकलं, केंद्रानी देशातील तरूणांचा रोजगार हिसकावून घेतला. त्यांना भविष्यात रोजगार मिळणं कठीण आहे. कोरोना काळात लोकांना मदत दिली नाही. शेतकऱ्यांसाठी तीन काळे कायदे केलेत, असंही राहुल गांधी म्हणाले. पत्रकार परिषेदमध्ये बोलत होते.

पंतप्रधानांनी देशाच्या पाठीचा कणा असलेली रेल्वे 1.5 लाख कोटींना विकली, 1.6 लाख कोटींच्या रस्त्यांची विक्री केली. बेलची पाइपलाईन, पेट्रोलियमची पाइपलाईन, बीएसएनएल आणि एमटीएनएलची विक्रीही केंद सरकारने केली. तसेच गोदामांची विक्रीही केली असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी मोदी सरकार केला आहे.

दरम्यान, केंद्र सरकार 25 विमानतळ, 9 बंदरे आणि 31 प्रकल्पांची विक्री करत आहेत. राष्ट्रीय स्टेडियमही विकत जात आहे. हे सर्व देशात बनवण्यासाठी 70 वर्षे लागली होती, परंतु ती आता  देशातील फक्त 4 उद्योगपतींच्या हवाली करत आहे, असंही राहुल गांधींनी सांगितलं आहे.

पाहा व्हिडीओः

थोडक्यात बातम्या-

नितेश राणे पेटून उठलेत?, मध्यरात्री केलं हे ‘करारा जवाब’ देणारं ट्विट

गाढवाची गोष्ट सांगत अर्जुन खोतकरांची राणेंवर टीका, पाहा व्हिडीओ

“आता महाविकास आघाडी सरकारने मारत बसा माशा”, पाहा आठवलेंच्या भन्नाट कवितेचा व्हिडीओ

राऊत म्हणाले, ‘कोण राणे?,’ चंद्रकांतदादा म्हणतात, ‘कोणता सामना, आम्ही किंमत देत नाही!’

नारायण राणेंनंतर कुणाचा नंबर?; ‘या’ नेत्यांवर अटकेची टांगती तलवार!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More