बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पाकच्या नव्या पंतप्रधानांना मोदींनी दिल्या शुभेच्छा, म्हणाले…

नवी दिल्ली | पाकिस्तानचे नवनिर्वाचित पंतप्रधान शहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी खास शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदींनी ट्विट करत शहबाज शरीफ यांचं पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केलं आहे.

पंतप्रधान शरीफ यांना शुभेच्छा देताना पंतप्रधान मोदींनी आतंकवादाचा उल्लेख करत एक संदेश दिला आहे. भारताला दहशतवादमुक्त प्रदेशात शांतता आणि स्थैर्य हवे आहे. जेणेकरून आम्ही आमच्या विकासाच्या आव्हानांवर लक्ष केंद्रीत करू शकू आणि आमच्या लोकांचे कल्याण व समृद्धी सुनिश्चित करू शकू, असं पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.

शहबाज शरीफ यांनी सोमवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास पाकिस्तानच्या (Pakistan) पंतप्रधान पदाची शपथ घेतली. मला भारतासोबत चांगले संबंध हवे आहेत. मात्र, काश्मीर (Kashmir) प्रश्न सोडवल्याशिवाय हे होऊ शकत नाही, असं वक्तव्य शहबाज शरीफ यांनी नॅशनल असेंब्लिशी बोलताना केलं आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानात राजकिय नाट्य पाहायला मिळत होतं. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना पंतप्रधान पदावरून हटवल्यानंतर पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझचे (PML-N) अध्यक्ष शहबाज शरीफ यांनी पाकिस्तानचे 23वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.

 

थोडक्यात बातम्या-

“दंगल पेटवणारे सहसा उच्चवर्गीय ब्राम्हण असतात”

“भाजपचं हिंदुत्व मतलबी आणि तकलादू असल्याचं आता स्पष्ट झालंय”

नोकरीची सुवर्णसंधी! आयटी क्षेत्रातील ‘ही’ नामांकित कंपनी देतेय तब्बल 60 हजार नोकऱ्या

“किरीट सोमय्या असं कॅरेक्टर जे महाराष्ट्रात फक्त भोंगा घेऊन बोंबलतं”

तेल कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहिर, वाचा आजचे दर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More