बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लसीकरण प्रमाणपत्रानंतर गरिबांना पुरवण्यात येणाऱ्या ‘रेशन’वरही मोदींचा फोटो!

नवी दिल्ली | नागरिकांना कोरोना लसीकरण प्रमाणपत्र दिलं जातं आहे. या प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो लावण्यात आला आहे. अशात पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनें’तर्गत गरिबांना देण्यात येणाऱ्या ‘रेशन’वरही मोदींचा फोटो छापण्यात आल्याची माहिती आहे.

भाजपशासित राज्यांत धान्यावरही नरेंद्र मोदी आणि राज्यातील मुख्यमंत्र्यांचा फोटो लावण्याचे निर्देश पक्षनेत्यांकडून जारी करण्यात आलेत. तसेच ज्या पिशव्यांतून हे पाच किलो धान्य गरिबांना पुरवलं जाणार आहे त्यावरही भाजपचं निवडणूक चिन्ह असलेल्या कमळाचे फोटो लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

यासाठी एक 11 सूत्री कार्यक्रम देखील आखण्यात आला आहे. बॅनरची डिझाईन, धान्याच्या बॅगची डिझाईनही भाजपाच्या केंद्रीय कार्यालयाकडून निश्चित करण्यात आली आहे.

दरम्यान, कोरोना लसीकरण प्रमाणपत्रावरही मोदींचा फोटो लावण्यात आलाय. मात्र याला विरोधी पक्षांनी वेळोवेळी विरोधही दर्शवला आहे. काही दिवसांपूर्वी गैर-भाजपशासित राज्यांत लसीकरण प्रमाणपत्रावरचा नरेंद्र मोदींचा फोटो हटवून मुख्यमंत्र्यांचा फोटो वापरण्यात आला होता.

थोडक्यात बातम्या- 

‘कोरोनाचे डेल्टासारखे व्हेरिएंट…’; WHO च्या प्रमुखांनी दिली अत्यंत महत्वाची माहिती

“मी तुमच्या पैशातून महिन्याला 2 लाख रुपये पगार घेतो, माझी जबाबदारी आहे”

“राहुल गांधी म्हणतात तसं चौकीदार ही चोर है हेच सत्य आहे”

“भाजपच्या काळात खनिजकर्म महामंडळामध्ये 43 हजार कोटींचा घोटाळा”

संजय राऊत-आशिष शेलार यांच्या गुप्त बैठकीवर नाना पटोले म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More