बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनापासून बचाव करण्यासाठी ‘या’ 2 गोष्टी सातत्याने करा; आरोग्य मंत्रालयाची नागरिकांना सूचना

नवी दिल्ली | देशासह विदेशात कोरोनाचा कहर सुरु असताना या आजारापासून आपल्या नागरिकांना वाचवण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. यासाठी सरकारकडून विविध मार्गांचा तसेच सूचना देण्याचा वापर केला जात आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं यासंदर्भात भारतीय नागरिकांना पुन्हा एकदा एक अपिल केलं आहे. दोन महत्त्वाच्या गोष्टी यामध्ये सांगण्यात आल्या आहेत. १. लोकांनी सातत्याने आपले हात धुतले पाहिजेत व २. इतरांपासून सुरक्षित अंतर राखलं पाहिजे, असं हे अपिल आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडूनच नव्हे तर संपूर्ण जगभरात याच सूचना दिल्या जात आहेत आणि वारंवार त्याची लोकांना आठवण करुन दिली जात आहे. अजूनही या आजारावर लस सापडलेली नाही त्यामुळे काळजी घेणं हाच या आजारावरील सर्वात मोठा उपाय आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाचा कहर अजूनही सुरुच आहे. मुंबई-पुण्यासह काही शहरांमध्ये या आजारानं आपले चांगलेच हातपाय पसरले असून प्रशासन या आजाराला अटकाव करण्यासाठी आपल्या प्रयत्नांची शिकस्त करत आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

पुण्यात एकाच दिवशी 399 बाधित; महापौरांच्या खुलाश्याने पुणेकरांनी सोडला सुटकेचा निश्वास

रेल्वेचा गोंधळ… मुंबईत रात्री उशिरा CSMT आणि टिळक टर्मिनसवर झोप उडवणारी गर्दी

महत्वाच्या बातम्या-

केंद्राकडून राज्याला कोरोनाविरुद्ध उपाययोजनेसाठी एकही पैसा मिळाला नाही- वडेट्टीवार

काँग्रेसचा हात उद्धव ठाकरेंबरोबरच… काँग्रेस सरकारबाहेर पडणार म्हणणाऱ्यांना राहुल गांधींनी सुनावलं

लघु-मध्यम-सूक्ष्म उद्योगांना मदत करणार; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More