बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

वाह शमी वाह! मोहम्मद शमीने वॉटलिंगच्या उडवल्या दांड्या; पाहा व्हिडीओ

मुंबई | इंग्लंडमध्ये जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना चालू आहे.सामन्याचा पहिला दिवस आणि चौथा दिवस पावसामुळे वाया गेला. मात्र पाचवा दिवस भारतासाठी चांगला जात असल्याचं दिसत आहे. भारताच्या 217 धावांचा पाठलाग करणाऱ्या न्युझीलंड संघाची अवस्था काहीशी नाजूक झाली आहे.

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने न्युझीलंड संघाच्या 3 गड्यांना बाद केलं आहे. यामध्ये न्युझीलंडचा यष्टीरक्षक वॉटलिंग, रॉस टेलर आणि ग्रँडहोम यांना बाद करत सामना जिंकण्याचा भारतीयांच्या आशा कायम ठेवल्या आहेत. शमीने वॉटलिंगला बाद करत त्याच्या अंतिम सामन्यात मोठी धावसंख्या बनवण्यापासून रोखलं आहे.

इंग्लंड दौर्‍यानंतर तो निवृत्ती घेणार आहे. न्यूझीलंडच्या पहिल्या डावात वॉटलिंगला मोठी खेळी करण्याची सुवर्णसंधी होती. मात्र शमीने त्याला जास्त वेळी खेळपट्टीवर तग धरू दिला नाही. भारतीय गोलंदाजांनी ड्रिंक्स ब्रेकनंतर आक्रमक गोलंदाजी करत न्युझीलंडला एकावर एक धक्के दिले आहेत. त्यामुळे  2 बाद 101 धावांवरून न्युझीलंडने सध्या 171 धावांवर 6 गडी गमावले आहेत.

दरम्यान, न्युझीलंडची धावसंख्या 179 धावांवर 6 गडी गमावले आहेत. न्युझीलंडचा कर्णधार विलियमसनने एक बाजून धरली आहे. इतर फलंदाजांना मात्र खेळपट्टीवर स्थिरावताना दिसत नाय्येत. शेवटच्या सत्रापर्यंत न्युझीलंड आणखी किती धावा करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

धक्कादायक! मुंबईत बेशुद्ध अवस्थेत असलेल्या रूग्णाचे डोळे उंदराने कुरतडले

‘कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यावर बाहेर पडा पण…’; आरोग्य मंत्रालयाने दिला ‘हा’ महत्वाचा सल्ला

भाजप नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची गाडी अडवली, नार्वेकर म्हणाले, ‘यांना गाडीत टाका शिवबंधंन बांध’

पैज लावून सांगतो देशात कोरोनाची तिसरी लाट येणार नाही- राकेश झुनझुनवाला

सरकार कोरोनाला नाही तर विरोधकांना घाबरत आहे- चंंद्रकांत पाटील

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More