राम जन्मभूमीवर फक्त मंदिरच होणार, दुसरी कुठलीही वास्तू नाही!

मोहन भागवत, सरसंघचालक

बंगळुरू | अयोध्येतील रामजन्मभूमीवर फक्त राम मंदिरच उभं राहिल, तिथं दुसरी तिसरी कुठलीही वास्तू उभी राहू शकत नाही, असं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलंय. कर्नाटकात उडुपीतील धर्मसंसदेला संबोधित करताना ते बोलत होते. 

अयोध्येत राम मंदिरचं उभं राहिल, तिथं असलेल्या शिळांचा वापर करूनचं ते उभारण्यात येईल. लवकरच राम मंदिरावर भगवा फडकताना दिसेल. तो दिवस फार लांब नाही, असंही ते म्हणाले.

दरम्यान, 5 डिसेंबरपासून सर्वोच्च न्यायालयात अयोध्या प्रकरणावर सुनावणी सुरू होणार आहे.